अलर्ट! 48 तासांत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

अलर्ट! 48 तासांत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरातील तयार झालेल्या दाबामुळे वातावरणात येत्या 48 मोठा बदल होईल, असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मार्च : एकीकडे उन्हाळा सुरु होत असतानाच येत्या 24 ते 48 तासांत देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात विदर्भ, दक्षिण पूर्व आणि पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता आहे. स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार 23 मार्च रोजी संध्याकाळपर्यंत हवामानात अनेक बदल होतील. येत्या 48 तासांत अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात पावसाची तीव्रता अधिक असेल असा अंदाजही वर्तवण्यात आला होता. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी रात्री उशिरा पश्चिम महाराष्ट्रात हलक्या तर विदर्भातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीटही झाली होती. येत्या एका आठवड्यात 23-24 मार्च दरम्यान मध्य भारतातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यावेळी मध्य भारतातील पश्चिम भागात परिणाम होईल. 24 मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. या दिवशी मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता सर्वाधिक असेल.

देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असतानाच राज्याच्या काही भागांवर पुढील 48 तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

राजस्थानमध्ये 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, 26 मार्च इंदूर, उज्जैन, रतलाम, देवास, कोटा, सवाई माधोपूर, जोधपूर, उदयपूर, अहमदाबाद, बडोदा, गांधीनगर आणि नाशिक अशा अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 मार्चपासून दक्षिण राजस्थान आणि गुजरातमध्ये पाऊस कमी होईल, परंतु मध्य प्रदेशात भोपाळसह अनेक शहरांमध्ये पाऊस सुरूच राहील असा स्कायमेटनं अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्यातील होणाऱ्या या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2020 12:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading