राज्यात हवामानाचा यू-टर्न, 'या' भागांमध्ये वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात हवामानाचा यू-टर्न, 'या' भागांमध्ये वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

मराठवाड्यात नांदेड, औरंगाबाद, पश्चिम विदर्भात अकोला अमरावतीमध्ये 24 तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Share this:

पुणे, 10 मे : राज्यात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असताना आता राज्यात सातत्यानं हवामान बदल होत आहेत. आधीच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामध्ये अवकाळी पावसानं झोपडल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. तर मुंबई-पुण्यामध्ये उष्णतेत कमालीची वाढ झाल्यानं नागरिक हैराण झाले आहेत. पुणे, अहमदनगर आणि नाशिकमध्ये पुढील 48 तासांत वादळीवाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढचे 5 दिवस मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आधीच कोरोनाचा संकट आहे त्यामध्ये हवामानातील होणाऱ्या बदलामुळे व्हायरलचं संकट ओढवू शकतं नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. यासोबतच कोकणातील काही भागांमध्ये रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अधून मधून येणाऱ्या या अवकाळी पावसामुळे यंदा मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजू बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. कैऱ्या पडत असल्यानं बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे.

हे वाचा-मान्सूनची वेळ बदलली; 'या' तारखेला मुंबईत दाखल होणार, स्कायमेटची माहिती

मराठवाड्यात नांदेड, औरंगाबाद, पश्चिम विदर्भात अकोला अमरावतीमध्ये 24 तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य विदर्भात वर्धा आणि नागपूरमध्ये ढगाळ वातावरण राहिल. विदर्भात गडचिरोली आणि चंद्रपूर इथे सोमवारी पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. कोल्हापुरातील काही भाग, सातारा, पुणे आणि अहमदनगरमध्येही 48 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हे वाचा-कंबर दुखायला लागली म्हणून झाला अ‍ॅडमिट, CT Scan रिपोर्ट पाहून डॉक्टर हैराण

हे वाचा-एसटी प्रवासाबाबात सरकारचा नवा आदेश, फक्त या 2 परिस्थितीतच मिळणार मोफत बस सेवा

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 10, 2020, 11:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading