मतदानावर पावसाचं सावट, वाचा तुमच्या भागातील पावसाचे अपडेट्स

मतदानावर पावसाचं सावट, वाचा तुमच्या भागातील पावसाचे अपडेट्स

मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसानं,मान्सूननंतरही राज्यभरात पाऊस, अनेक भागात शेतीचं मोठं नुकसानं

  • Share this:

मुंबई, 20 ऑक्टोबर: मान्सूनची एक्झिट झाली तरीही राज्यात पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये रिमझिम तर पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पाऊस आहे. पश्चिम हाराष्ट्रात 23 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पवसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईसह उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी असतील असं हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

21 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर पावसाचं सावट असल्यानं नेतेमंडळी चिंतेत आहेत. तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेला पिकांचा घास पावसानं हिसकावल्यानं बळीराजा चिंतेत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांची पीकं अक्षरश: भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे आधीच हमीभाव कमी त्यात पावसामुळे झालेलं पिकांचं मोठं नुकसानं यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. विदर्भ वगळता राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुणे वेधशाळेने हा अंदाज दिला आहे. भिवंडीत परतीच्या पावसाने भात शेतीच मोठं नुकसान झालं. भिवंडी तालुक्यामध्ये शुक्रवार रात्रीपासून सुरू असणाऱ्या पावसानं शेतकरी हवालदिल झाले. भिवंडीत मोठ्या प्रमाणात कापून ठेवलेलं भात पीक शेतामध्येच भिजून गेलं. टिटवाळा ,वासिंद या ग्रामीण भागातील पट्ट्यात हाता तोंडाला आलेले भाताचे पीक भुईसपाट झाली आहेत. यावर्षी चांगल्या पावसामुळे भात शेती चांगली झाल्याने शेतकरी आनंदात होता. मात्र त्यातचं परतीच्या पावसामुळे या रोपांचं नुकसान झालं. लवकरात लवकर याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

पुण्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. पुण्यातील काही भागात चांगला पाऊस होतोय. शनिवारी रात्रीही पुण्यात पाऊस झाला. मतदानाच्या दिवशीही राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला.

चाळीसगाव तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसानं कापूस ज्वारी बाजरी पिकांचे मोठे नुकसान झालं. तसंच आदर्श जयहिंद कॉलनीतील रस्त्यांवर दोन फुटापेक्षा जास्त पाणी सध्या साचलं होतं.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्याला वादळी पावसाने झोडपून काढलं. याचा सर्वाधिक फटका भात शेतीला बसला. तालुक्यातील शेकडो हेक्टरमधील भाताची शेतीचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. या नुकसानीची शासनाकडून भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

मनमाड,मालेगाव, चांदवड,नांदगाव, येवला परिसरातही पावसानं दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीवर आलेले मका, बाजरीसह इतर पिकांना फटका बसणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी परतीचा पाऊस बरसत आहे. बीड जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तर उद्यापर्यंत जिल्ह्यात असाच पाउस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून सलग 15 तासांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.

SPECIAL REPORT : आमदार व्हायचं तर धोतर नेसलेच पाहिजे, 'या' मतदारसंघात अजब दावा

First published: October 20, 2019, 7:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading