मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai Rain Weather Update : मुंबईसह उपनगरात पाऊस थैमान घालणार, पुढचे तीन दिवस महत्वाचे IMD कडून इशारा

Mumbai Rain Weather Update : मुंबईसह उपनगरात पाऊस थैमान घालणार, पुढचे तीन दिवस महत्वाचे IMD कडून इशारा

परतीच्या पावसाची देशात पहिल्यांदा राजस्थानात चाहूल लागली असली तरी मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. (Mumbai Rain Weather Update)

परतीच्या पावसाची देशात पहिल्यांदा राजस्थानात चाहूल लागली असली तरी मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. (Mumbai Rain Weather Update)

परतीच्या पावसाची देशात पहिल्यांदा राजस्थानात चाहूल लागली असली तरी मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. (Mumbai Rain Weather Update)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 29 सप्टेंबर : मागच्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान विदर्भासह राज्यातील विविध भागात परतीच्या पावसाने थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. परतीच्या पावसाची देशात पहिल्यांदा राजस्थानात चाहूल लागली असली तरी मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. काल(दि.28) मुंबईसह उपनगरात पावसाने हलकी झलक दाखवली असली, तरी पुढील तीन दिवस राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

याचबरोबर राजस्थानात परतीच्या पावसाची चाहूल लागली असली तरी परतीच्या पावसाची पुरेशी आगेकूच झालेली दिसत नाही. यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. परंतु राज्यातील विविध भागात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परतीचा पाऊस 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार असला, तरी त्याचा सध्याचा वेग पाहता त्याला राज्यात येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : अन् पाहता-पाहता सहाही जण पुराच्या पाण्यात वाहून गेली, बार्शीतला हृदयाचा थरकाप उडवणारा VIDEO

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (दि.29) गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, प. महाराष्ट्र, उ. महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

29 सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा व गडगडाटासह विखुरलेल्या भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, ठाणे जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता जाणवते.

उत्तर पंजाब आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पूर्व पश्चिम पट्टा सक्रिय आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून4.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दरम्यान 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस थांबण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्रातला बडा नेता जेव्हा 'सर्जाराजा'चे आभार मानतो, अतिशय हळवे आणि बोलके क्षण, पाहा VIDEO

यंदाच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका

राज्यात जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात चांगल्या पावसानं हजेरी लावली होती. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

First published:

Tags: Mumbai rain, Pune rain, Rain fall, Weather forecast, Weather update, Weather warnings