• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Weather Update: राज्यात आजपासून अवकाळी पाऊस बरसणार; पुण्यासह 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Weather Update: राज्यात आजपासून अवकाळी पाऊस बरसणार; पुण्यासह 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Weather in Maharashtra: विदर्भात सुर्य उन्हाचे तीव्र चटके देत असताना, आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी (Unseasonal rain) कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 एप्रिल: विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत आहे. बुलडाणा वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा (Temperature in Vidharbha) चाळीशी पार गेला आहे. विदर्भातील ब्रह्मपूरी याठिकाणी तापमानाचा उच्चांक नोंदवला गेला असून येथील तापमान 42.8 अंश सेल्सिअस इतकं आहे. त्यापाठोपाठ चंद्रपूर, अकोला, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील तापमान 41-42 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. असं असलं तरी, उर्वरित महाराष्ट्राला मात्र तापमानाने काही अंशी दिलासा दिला आहे. एकीकडे विदर्भात सूर्य उन्हाचे तीव्र चटके देत असताना, आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी (Unseasonal rain) कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. सध्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होतं आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणासह राज्यातील सर्वच भागांत आजपासून पुढील पाच दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासोबतचं गारपीटीसह हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जिल्ह्यानुसार पावसाची शक्यता रविवार - सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि संपूर्ण मराठवाडा सोमवार -  सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली,  यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा मंगळवार- अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,  पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा बुधवार - अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा,  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली,  यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा हे ही वाचा-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यात 18 वर्षावरील सगळ्यांना मिळणार मोफत लस देशात सध्या अनेक ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दक्षिण भारतासह उत्तरेकडील काही राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि तमिळनाडूची दक्षिण किनारपट्टी दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. राज्यातील दक्षिण भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: