Weather Update: मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या शहरात 'असा' असेल हवामानाचा अंदाज

Weather Update: मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या शहरात 'असा' असेल हवामानाचा अंदाज

मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर: मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर ऊन पावसाचा खेळ सुरू असला तरीही पावसानं पुन्हा एकदा कालपासून जोर धऱला आहे. येत्या 24 तासांत मुसधार पाऊस असेल त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पालघर जिल्ह्यात शुक्रवारी धो धो पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. डहाणू विक्रमगड तलासरी जव्हार मोखाडा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. नदी नाल्यांना पुराचे स्वरुप आलं आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसा पासून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाऊस मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे.

मनमाड पासून जवळ असलेल्या अंकाई किल्ला परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं किल्ल्यावरील धबधबे ओसंडून वाहत आहेत. किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागातून वाहणारे धबधबे आणि सर्वत्र पसरलेली हिरवळ, हिरवंगार जंगल असं डोळ्यांचं पारणं फेडणारं दृष्य पाहायला मिळतं असल्यानं आल्हाददायी आणि निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

येवला तालुक्यातील अंदरसुल,लासलगावसह इतर भागात ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीत कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसात कांदा भिजल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.

Loading...

कॅप्टन कुल धोनीच्या घरी कित्येक दिवस लाईटच नाही, रागात साक्षी म्हणाली...

वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. पेनटाकळी प्रकल्पात 97 टक्के जलसाठा झाल्यानं धरणाचे सगळे 9 वक्रद्वार 20 सेंटीमीटरने उघडल्याने नदीपात्रात 6720 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गामुळे वाशिम जिल्ह्याच्या रिसोड आणि वाशिम तालुक्यातील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पावसानं मांगेली, जिरापूर, गाडेघाट अशा 8 ते 10 गावांना झोडपलं. या पावसामुळं शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

रिझर्व्ह बँकेत नोकरीची मोठी संधी, 'या' पदांसाठी करा अर्ज

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

SPECIAL REPORT : पुण्यातही शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 07:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...