Home /News /maharashtra /

राज्यात पावसाचा जोर कायम; पुण्यासह मराठवाड्यात कोसळणार सरी, गारपिटीचीही शक्यता

राज्यात पावसाचा जोर कायम; पुण्यासह मराठवाड्यात कोसळणार सरी, गारपिटीचीही शक्यता

पावसात भिजल्यावर कपडे तात्काळ बदलावेत. पावसात भिजल्याने शरीराचं तापमान कमी होतं. त्यामुळे घशात, नाकात विषाणू शिरतात.

पावसात भिजल्यावर कपडे तात्काळ बदलावेत. पावसात भिजल्याने शरीराचं तापमान कमी होतं. त्यामुळे घशात, नाकात विषाणू शिरतात.

Weather forecast: आज मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे चार तासात पुण्यासह विविध ठिकाणी पाऊसाच्या सरी कोसळणार आहेत, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

    सिंधुदुर्ग, 08 मे: गेल्या चार दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पावसानं (Non seasonal rain) हजेरी लावली आहे. शुक्रवारी तर राज्यात अनेक ठिकाणांना अवकाळी पावसांनं झोपडलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची आंब्याची झाडं, फुलं, हळद आणि फळबागा जमीनीदोस्त झाल्या आहेत. तसेच वीज कोसळून बऱ्याच लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. पुढील आणखी चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज (Weather forecast) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. भारतीय वेधशाळेनं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे ढग दाटले आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार तासात राज्यात पुण्यासह अहमदनगर, सांगली, सातारा, हिंगोली, बीड, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. वीज कोसळल्यानं जनावरं दगावली राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या दरम्यान वीज कोसळून मोठी जीवितहाणी झाली आहे. काल औराद याठिकाणी वीज कोसळल्यानं तब्बल 15 जनावरं जळून खाक झाली आहेत. तर अतनूर याठिकाणीही एका बैलाचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात वीज कोसळल्यानं वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. सध्या राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानासोबतचं जीवितहाणी होण्याचं प्रमाणही  वाढलं आहे. त्यामुळे पाऊस पडत असताना किंवा वीजा चमकत असताना मोकळ्या जागेत येऊ नये, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हे ही वाचा-हवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल त्यामुळे पुढील आणखी चार दिवस राज्यासह संपूर्ण देशात अनेक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. आज विदर्भासहित दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Solapur, Weather forecast

    पुढील बातम्या