मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Weather Update: विदर्भात काही ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

Weather Update: विदर्भात काही ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

Weather Update: भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर येथे तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 15 ऑगस्ट : राज्यातील अनेक भागात पावसाची रिपरिप सुरुच आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक ठिकाणी नदी-नाले, ओढे ओसंडून वाहत होते. आता काहीशी पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होण्याचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेत विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही आहे. गोंदियामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर येथे बहुतांश ठिकाणी, नागपूरमध्ये अनेक ठिकाणी, अमरावती, अकोला येथे काही ठिकाणी, विदर्भातील वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना स्वातंत्र्य दिनाची भेट, मध्य रेल्वेवर धावणार आणखी 10 एसी लोकल!
 भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर येथे तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर जाताना खबरदारी घ्यावी किंवा घरातच रहावे अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. आज पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उद्या 16 ऑगस्ट रोजीरी या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.
First published:

Tags: Rain, Todays weather, Weather forecast

पुढील बातम्या