एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात तापमानाचा पारा गाठणार चाळीशी

एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात तापमानाचा पारा गाठणार चाळीशी

महाराष्ट्राच्या सीमारेषेवर असलेल्या भद्राचलम इथे 40.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 03 एप्रिल : कोरोना व्हायरससोबतच आणखी एक संकट म्हणजे पाऊस उत्तरेकडील अनेक भागांमध्ये येत्या 48 तासांत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात असतानाच महाराष्ट्रसह अनेक दक्षिणेकडील राज्यांमध्ये मात्र तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रात्री तापमान कमी असलं तरी पुढचे दोन दिवस दिवसभरातील तापमान 40 ते 42 डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात कमालीचे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भर दुपारी वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे तर रात्री हवेत काहीसा गारवा जाणवत आहे. भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस दक्षिण भारतात केरळ, तमिलनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमान चाऴीशी पार करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोरोनामुळे आधीच लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर जाण्याचा प्रश्न येत नाही परंतु तापमानातील अशा अचानक बदलांमुळे आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. त्यामुळे कोरोनासोबतच आता वाढत्या तापमानाचाही सामना करावा लागणार आहे. तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काहीसं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या सीमारेषेवर असलेल्या भद्राचलम इथे 40.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी मध्य प्रदेशातील एका शहरात 43 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच 40.6 अंश तापमान आहे अजून संपूर्ण एप्रिल आणि मे महिना जाणं बाकी आहे. त्यामुळे आणखी तापमानात वाढ झाली तर मागच्या वर्षीच्या रेकॉर्ड तोडला जाईल का? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. अधे-मध्ये येणाऱ्या अवकाळी पावसामुळे बागायतदारांचं नुकसान होत आहे. आधीच कोरोनामुळे व्यापार ठप्प झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे त्यामध्ये बदलत्या हवामानामुळे आणखीनच चिंता वाढली आहे.

First published: April 3, 2020, 3:01 PM IST

ताज्या बातम्या