मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Weather Update : उकाड्यापासून दिलासा! राज्यात हलक्या सरींचा अंदाज, कमाल तापमानात होणार घट

Weather Update : उकाड्यापासून दिलासा! राज्यात हलक्या सरींचा अंदाज, कमाल तापमानात होणार घट

राज्यात हलक्या सरींचा अंदाज

राज्यात हलक्या सरींचा अंदाज

मुंबईसह उपनगरांनाही उकाडय़ापासून दिलासा मिळणार आहे. राज्यातील इतर भागातही तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.

मुंबई 26 मे : मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात मोठी वाढ होण्यास सुरुवात झाली. या उकाड्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले असून दुपारच्या वेळी अनेक जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उकाड्यापासून हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुढील 2 दिवसांत राज्यात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Monsoon Update: दिलासादायक! राज्यात यादिवशी दाखल होणार मान्सून, पण एक चिंता वाढवणारी बातमी

मुंबईसह उपनगरांनाही उकाडय़ापासून दिलासा मिळणार आहे. कारण पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा आणि तुरळक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि परिसरात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. दोन ते तीन अंशानी ही घट होईल. तर शुक्रवारी तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील इतर भागातही तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. सध्या विदर्भ, मराठवाडयामधील अनेक भागांमध्ये कमाल तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या भागांमधील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र पुढील पाच दिवसांमध्ये इथेही तापमानात हळूहळू घट होईल. देशातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात 4 ते 6 अंशांची घट पुढील पाच दिवसांत होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही मान्सूनचीआतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुढील दोन दिवसात मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानविभागाने याबाबतची माहिती दिली आहे. अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सूनचे संकेत मिळाले आहेत. कोकणात दोन दिवसांत म्हणजेच 27 मेपर्यंत मान्सूनपूर्व पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. यामुळे राज्यात सात जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Todays Weather, Weather Update