Home /News /maharashtra /

Weather Alert! पुढील 4 तासांत पुण्यासह सातारा जिल्ह्याला अवकाळी पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा इशारा

Weather Alert! पुढील 4 तासांत पुण्यासह सातारा जिल्ह्याला अवकाळी पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा इशारा

Weather Update today: काल पडलेल्या अवकाळी पावसामुळे औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील केळी आणि द्राक्षांच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

    पुणे, 14 एप्रिल: मागील आठवड्यापासून महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी अवकाळी पावसाने (Nonseasonal Rain) हजेरी लावली आहे. काल लातूर परभणी, जालना, औरंगाबाद, सोलापूर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलचं झोडपलं आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना (nonseasonal rain impact on farmer) बसला आहे. काल पडलेल्या अवकाळी पावसामुळे औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील केळी आणि द्राक्षांच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कोरोना लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसानं दुहेरी फटका दिला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल होताना आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामानाची स्थिती कायम राहणार आहे. तर विदर्भासहित मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. त्याचबरोबर पुढील 3 ते 4 तासांत धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे आणि सातारा या जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळणार आहेत, अशा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. हे वाचा- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं सावट; पुढील 3 दिवासांत या जिल्ह्यांत पावसाची हजेरी काल केरळ राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. पुढील चार दिवस नैऋत्येकडील भारतीय द्विकल्पात विविध ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम राज्यस्थानमधील तुरळक ठिकाणी उद्या आणि परवा (15 आणि 16 एप्रिल) मेघगर्जनेसह वादळी पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर वेगवान वाऱ्यामुळे राज्यात धुळीचं साम्राज्य निर्माण होईल, असंही हवामान खात्यानं सांगितलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Pune, Weather forecast, Weather warnings

    पुढील बातम्या