Weather update: राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशार तर रायगडमध्ये रेड अलर्ट

Weather update: राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशार तर रायगडमध्ये रेड अलर्ट

मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, रायगडमध्ये रेड अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर: मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर पुढील 24 तासांत रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तास वीजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरं, रायगड, कोकण किनारपट्टी, पुणे सातारा भागांमध्ये हवामान विभागाने गुरुवारी रेड अलर्ट असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र पावसानं उसंत घेतली. आज पुन्हा पहाटेपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासन आणि हवामान विभागाकडून सावधानतेचा इशारा देणात आला आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातीलजुन्नर, आंबेगाव,खेड,शिरुर तालुक्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पातील पाच धरणं सुमारे 92.17 टक्के भरली आहेत. असाच पाऊस सुरू झाला तर धरणं ओव्हर फ्लो होण्याची भीती आहे. मनमाड शहर परिसराला गुरवारी जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. सुमारे दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला तर नदीपात्राबाहेर पाणी आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली.

वाशिम जिल्ह्यातील किन्ही राजा आणि वनोजा परिसरात पावसाने गुरूवारी हजेरी लावली. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून केवळ एकबुर्जी प्रकल्प 50 टक्क्यांपर्यंत भरला असला तरी 134 प्रकल्पांपैकी अजूनही 37 जलप्रकल्पात फक्त शून्य टक्के जलसाठा आहे. त्यामुळे परतीच्या जोरदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

अनेक दिवसांपासून हूल दिलेल्या पावसानं अखेर मराठवाड्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली. काही भागात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वारा आणि पाऊस सुरू आहे. औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील पाचोड भागात सोसाट्याचा वारा आल्याने अनेक ठिकाणी बाजरी, मका आणि कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

उशिरा सक्रिय झालेल्या मान्सूनने नागपुर शहरात होणाऱ्या एकूण पावसाची सरासरी आताच ओलांडली आहे. तोतलाडोह आणि नवेगाव खैरी जलाशय सुद्धा ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे.

मुसधार पावसामुळे लातूरमधील निलंगा तालुक्यातील उमरगा रस्त्यावर पुलावरुन पाणी गेलं. यामध्ये दोन दुचाकीस्वार या पाण्यात वाहून जात होते मात्र नागरिकांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे.

SPECIAL REPORT : कल्याणमध्ये अवतरले 'अंतराळवीर'!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 07:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading