मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

weather Update Rain Alert : पाऊस काही सुख लागू देत नाही, गणपती झाला आता नवरात्रीत पावसाचे थैमान हवामान विभागाची माहिती

weather Update Rain Alert : पाऊस काही सुख लागू देत नाही, गणपती झाला आता नवरात्रीत पावसाचे थैमान हवामान विभागाची माहिती

मागच्या चार दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान राज्यातील अद्यापही काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. (weather Update Rain Alert)

मागच्या चार दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान राज्यातील अद्यापही काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. (weather Update Rain Alert)

मागच्या चार दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान राज्यातील अद्यापही काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. (weather Update Rain Alert)

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 15 सप्टेंबर : मागच्या चार दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान राज्यातील अद्यापही काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. (weather Update Rain Alert) गणपतीच्या काळात पावसाने थैमान घातल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. दरम्यान आता नवरात्रीतही पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने माहिती दिली आहे. हवामान विभागाकडून पुढच्या चार आठवड्याची पावसाची अपडेट देण्यात आली आहे. संपूर्ण देशात पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुढच्या 4 आठवड्यांसाठी सुचीत केलेल्या सूचनांमध्ये पुढच्या दोन आठवड्यांसाठी उत्तर पश्चिम व उत्तर मध्य भारतात पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याचबरोब तीसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. यानंतर वायव्य भारतात अँटीसायक्लोनिक प्रवाह तयार होण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा : धोक्याची घंटा! किनारपट्टी भागातील 55 हेक्टर किनारा पाण्याखाली, महाराष्ट्रावर घोंघावतंय मोठं संकट?

मागच्या दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा सुरूच आहे. आज (ता. 15) उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. (Rain in Maharashtra) उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची, तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मान्सूनची आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, हा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र, सिधी, अंबिकापूर, जमशेदपूर, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल ते बांगलादेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र गोव्याच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

हे ही वाचा : Rain in Maharashtra : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार IMD कडून अलर्ट

कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. आज (ता. 15) उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा (येलो अलर्ट) अंदाज आहे. तर विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

First published:

Tags: Maharashtra rain updates, Rain fall, Weather, Weather update, Weather warnings

पुढील बातम्या