दिवाळी संपली, पाऊस नाही : या 18 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा

दिवाळी संपली, पाऊस नाही : या 18 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा

मुंबई आणि नागपूर वेधशाळेने राज्यातल्या तब्बल 18 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये Yellow Alert जारी करण्यात आला आहे. अजून तीन ते चार दिवस असं वातावरण राहण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 29  ऑक्टोबर : रेंगाळलेला मान्सून आणि त्यानंतर सुरू झालेला बिगरमोसमी पाऊस यातून अद्याप महाराष्ट्राची सुटका झालेली नाही. विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही दुपारनंतर वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि नागपूर वेधशाळेने राज्यातल्या तब्बल 18 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये Yellow Alert जारी करण्यात आला आहे. अजून तीन ते चार दिवस असं वातावरण राहण्याची शक्यता आहे.

क्यार चक्रीवादळाचा धोका टळला असला, तरी वातावरण अजूनही कोरडं झालेलं नाही. हवामानातल्या या बदलांमुळे नैर्ऋत्येकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात वादळी पाऊस होत आहे. मुंबई आणि पुण्यात दुपारच्या उन्हाचा चटका वाढला आहे, तर उपनगरांमध्ये दुपारनंतर अचानक वातावरण बदलून ढग दाटून येत असल्याचं बघायला मिळतंय. यामुळे हवेतली आर्द्रताही कायम आहे. याचा अर्थ दिवाळी संपली आणि ऑक्टोबर संपत आला तरी हिवाळा अजूनही दूरच आहे.

या जिल्ह्यांत आहे Yellow Alert

वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, नागपूर, उस्मानाबाद, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडू शकतो.

पाहा - दिवाळीतला कहर VIDEO : ओठातल्या पेटत्या सिगरेटने रॉकेट उडवताना कधी पाहिलंय?

या जिल्ह्यांना यलो अलर्ट म्हणजे मध्यम तीव्रतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात पाऊस कमी झालेला नाही. त्यातच आता उत्तर महाराष्ट्रातही पावसाला सुरुवात झाली आहे.

विदर्भ- मराठवाड्यात इशारा

ऐन दिवाळीत नागपूर शहराला पावसानं झोडपून काढलं होतं. पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. शेतकऱ्यांचं हातात आलेलं पीक गेल्याने मोठं नुकसान झालं आहे.

-------------------------------------

अन्य बातम्या

रिंकू राजगुरूचे दिवाळी सेलिब्रेशन; साडीतील फोटो पाहून चाहते झाले घायाळ!

सत्तास्थापनेचा 31 ऑक्टोबरचा मुहूर्त टळणार? अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतरच येणार नवं सरकार

भाजप आक्रमक, मुख्यमंत्री नाही तर शिवसेनेसोबत फक्त उपमुख्यमंत्रिपदावर चर्चा

बोअरवेलमध्ये अडकलेल्या सुजीतचे बचावकार्य पाहत होतं कुटुंब, घरातल्या चिमुकलीचा टबमध्ये बुडून मृत्यू

 

First published: October 29, 2019, 8:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading