Weather Alart: राज्यातील 'या' दोन जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

Weather Alart: राज्यातील 'या' दोन जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज

  • Share this:

पालघर, 16 सप्टेंबर: मुंबईसह उपनगरात पुढील 24 तास ऊन आणि पाऊस असेल मात्र रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. डहाणू विक्रमगड तलासरी जव्हार मोखाडा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. नदी नाल्यांना पुराचं स्वरुप आलं आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आलं आहे. रायगडमध्ये पुढील 48 तास यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.वसई विरारमध्ये रविवारी जोरदार पाऊस झाला असून सखल भागात पाणी साचलं होतं. टाकीरोड, तुळींज रोड, सेन्ट्रल पार्क,गाला नगर ,वसंत नगरी नालासोपारा स्टेशन परिसर,अचोळे रोड परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल झाले. पाऊस असाच सुरू राहिला तर पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नालासोपारा पूर्वेकडील जिजाई नगर पाण्याखाली गेलं होतं. चाळींमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झाले. घरातील वस्तू पाण्याखाली गेल्या.

पाण्यात उतरला होता विद्यूत प्रवाह... झटका बसताच विवाहितेचा मृत्यू

भिवंडी परिसरात रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं. मानकोली नाक्यावरून वेहळे, अंजूर, भरोडी, सुरई या गावांकडे जाणाऱ्या रोडवर पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल होताहेत.

जायकवाडी धरणात मोठ्या संख्येनं पाण्याची आवक होत असल्यानं पाणीसाठा 99.15 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. धरणातून पाणी सोडण्यासाठी यंत्रणा सज्ज झालीय. गोदावरी नदी काठावरील गावांना आधीच सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. 17 हजार क्यूसेकनं पाण्याची आवक सुरूच आहे. विदर्भाचं नंदनवन समजलं जाणारं चिखलदरा पर्यटन स्थळ सध्या पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आहे. संततधार पावसामुळं परिसरात धुक्याची चादर पसरली असून या आल्हाददायक वातावरणात पर्यटकांची चिखलदराकडे गर्दी होते आहे.

बेशिस्तपणाच्या आरोपावर उदयनराजेंचं कॉलर स्टाईल उत्तर, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 01:20 PM IST

ताज्या बातम्या