मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, 16 जिल्ह्यांसाठी अलर्ट, 4 जिल्ल्यांमध्ये धुवाँधार, विकेण्डचे 2 दिवस महत्त्वाचे

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, 16 जिल्ह्यांसाठी अलर्ट, 4 जिल्ल्यांमध्ये धुवाँधार, विकेण्डचे 2 दिवस महत्त्वाचे

रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

    मुंबई : तुम्ही सुट्टीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण रविवारी 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 16 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज तर अर्वरित जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि कोल्हापुरात गेल्या 48 तासांत पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलं. कोल्हापूर जिल्ह्यातील कोकणाकडे जाणारे बऱ्यापैकी रस्ते बंद आहेत. यातील कोल्हापूर-वैभववाडी (करुळ घाटात दरड कोसळल्याने बंद करण्यात आला होता. पुण्यात भिडे पूल पाण्याखाली गेला होता. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही अति मुसळधार पावसाचा इशारा पुढचे 2 दिवस देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही घराबाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हवामान विभागाचे अपडेट्स पाहूनच करा. नाहीतर अडकण्याची भीती आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: IMD FORECAST, Rain, Weather update

    पुढील बातम्या