मुंबई, 11 मार्च : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पण आता कोकण आणि मुंबई परिसरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांमध्ये कोकण आणि मुंबई परिसरात उष्णतेच्या तीव्रता वाढण्याची चिन्ह आहे. तापमान हे ३९ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
एकीकडे उन्हाचा पारा वाढत आहे तर दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पावसाचे सावट आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या मध्यप्रदेशमध्ये चक्राकार वाऱ्यामुळे हे परिणाम समोर येत आहे. त्यामुळे एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसाची शक्यता असं वातावरण तयार झालं आहे.
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या भागामध्ये ११ आणि १२ मार्च दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तर खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील १३ ते १६ मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये जळगाव, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, परभणी छत्रपती संभाजीनगर भागात पावसाची शक्यता आहे. तर
१५ ते १६ मार्च दरम्यान नागपूर, सातारा, लातूर, गोंदिया, सांगली, लातूर, धाराशिव, हिंगोली, बुलडाण्यात पावसाची चिन्ह आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Weather Update