क्यार चक्रीवादळाची तीव्रता वाढली; 24 तासांत आणखी तीव्र होणार

क्यार चक्रीवादळाची तीव्रता वाढली; 24 तासांत आणखी तीव्र होणार

अरबी समुद्रात निर्माण झालेलं क्यार #CycloneKyarr चक्रीवादळ पुढच्या 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी हे Kyarr Cyclone चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीपासून 190 किमी दूर होतं. मुंबईला आहे का या वादळाचा धोका?

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर : अरबी समुद्रात निर्माण झालेलं क्यार #CycloneKyarr चक्रीवादळ पुढच्या 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी हे Kyarr Cyclone चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीपासून 190 किमी दूर होतं. रत्नागिरीपासून पश्चिमेला साधारण 200 किमी अंतरावर हे वादळ असून उत्तर आणि ईशान्य दिशेकडे म्हणजेच मुंबईच्या दिशेने सरकत आहे. मुंबईपासून सध्या ते 340 किमी वर आहे.

पुढच्या 6 तासांतच ते अतितीव्र वादळात रुपांतरित होणार आहे. पुढचे दोन दिवस या वादळाचा परिणाम महाराष्ट्राला जाणवणार आहे. मुंबईत आणि उपनगरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस यामुळे पडू शकतो. पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह वादळी पाऊस होऊ शकेल. या भागात हवामान ढगाळ राहील आणि हलका पाऊस राहण्याची शक्यता जास्त आहे.

किनारपट्टीला धोका

क्यार चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनारपट्टीला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारी भागात मध्यरात्रीपासूनच जोरदार वारे वाहात आहेत आणि मुसळधार पाऊसही आहे. कोकण किनारपट्टीला शुक्रवारीच क्यार वादळाचा फटका बसला आहे . मध्यरात्रीपासून किनारपट्टीवर जोराचे वारे आणि पाऊस सुरू असून मालवणजवळच्या देवबाग भागात समुद्राच्या उधाणाचं पाणी भरलं आहे . अनेक घरात पाणी घुसल्यामुळे ग्रामस्थ घाबरलेत. तर राजकोट आचरा जामडूल भागातल्या वस्तीतही समुद्राच्या उधाणाचं पाणी भरलं आहे. मच्छीमारांच्या होड्यांच नुकसान झाल असून या भागात जोराचे वारे आणि पाउस सुरु आहे .सिंधुदुर्गात गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. तर शुक्रवारी मुंबईसह उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस असेल असा अंदाज वर्तवला आहे.

हे वाचा - विकेंडला सिनेमा प्लान करण्याआधी वाचा, ‘हाऊसफुल 4’ बद्दल काय म्हणतायत प्रेक्षक

पुढचे 24 तास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

वादळ मुंबईला धडकणार का?

'क्यार' चक्रीवादळाचे केंद्र सकाळी ११:३० ला रत्नागिरीपासून पश्चिमेला १९० किलोमीटरवर अरबी समुद्रात होते. पुढील २४ तासांत चक्रीवादळ थोडे उत्तरेकडे सरकून कोकण किनारपट्टीच्या विरुद्ध दिशेला वळण घेईल. पुढील पाच दिवस क्यार चक्रीवादळ ओमानच्या दिशेने अरबी समुद्रातून प्रवास करणार असून, या काळात त्याची तीव्रता अतितीव्र चक्रीवादळापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

क्यार चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिण कोकण, गोवा आणि उत्तर कर्नाटकच्या किनारपट्टीवर पुढील २४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून, दक्षिण कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर उत्तर कोकणात काही ठिकाणी जास्त पावसाच्या सरी अपेक्षित आहेत.

कोकण किनारपट्टीवर पुढील २४ तासांत तशी ४० - ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, त्यांचा सर्वोच्च वेग ताशी ६५ किलोमीटर पर्यंत पोहचू शकतो.

किती दिवस असेल पाऊस?

क्यार चक्रीवादळ मुंबईला धडकण्याची शक्यता कमी आहे. हे चक्रीवादळ 24 तासांनंतर वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. असं झालं तर तीव्रता वाढलेलं हे चक्रीवादळ मुंबईपासून दूर होत ओमानच्या दिशेने सरकेल. सध्या ते उत्तरेकडे सरकत आहे. पण त्यानंतर ते पश्चिमेकडे प्रवास करण्याची शक्यता आहे. वादळ थेट किनारपट्टीला धडकणार नसले तरी, कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 24तासांत मुंबई - गोवा महामार्ग, तसेच कोकणात जाणाऱ्या घाट रस्त्यांवरून प्रवास टाळावा. २७ तारखेपर्यंत किनारपट्टीवरील पर्यटनही टाळावे. 27 तारखेनंतर चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल. पावसाचं प्रमाणही कमी होईल.

--------------

VIDEO : कोकण किनारपट्टीला क्यार वादळाचा फटका! अनेक घरांमध्ये शिरलं समुद्राचं पाणी

First published: October 25, 2019, 7:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading