Alert मतदानाच्या दिवशी राज्यात कोसळधारा; या जिल्ह्यांत होणार वादळी पाऊस

Alert मतदानाच्या दिवशी राज्यात कोसळधारा; या जिल्ह्यांत होणार वादळी पाऊस

मान्सून परतल्याची बातमी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून या बेमोसमी पावसाला सुरुवात झाली असून सोमवारी - मतदानाच्या दिवशीसुद्धा राज्याच्या अनेक भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : भारतीय हवामान विभागाने (IMD)दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोकण आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सोमवारी वादळी पाऊस होऊ शकतो.

शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातलं वातावरण बदललं आहे. मान्सून परतल्याची बातमी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून या बेमोसमी पावसाला सुरुवात झाली असून सोमवारी (21 ऑक्टोबरला)मतदानाच्या दिवशीही पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्यामुळे याचा मतदानावर परिणाम होणार की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई उपनरांसह, ठाणे, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये शनिवारी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक आहे. असाच पाऊस सोमवारीही होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या पश्चिम प्रभागाचे सहसंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

वाचा - इंदूरमधील वीर सावरकरांच्या पोस्टरची देशभर चर्चा; पोस्टरवर म्हटलंय...

मोसमी पाऊस परतल्यानंतरही पावसाळा सुरू असण्यामागे हे कारण आहे. मंगळवारपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

कुठे आहे Alert?

पुणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये शनिवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने नोंदवली आहे. या जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊसही होऊ शकतो.

वाचा - कमलेश तिवारी हत्या : दुबईत कट, सुरतमध्ये बंदूकीची खरेदी आणि लखनऊत गळा चिरून खून!

त्यासाठी इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सोमवारी - मतदानाच्या दिवशीची पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यात विजांसह पाऊस

मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

कोकण किनारपट्टीवर पाऊसधारा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणात पुढचा आठवडाभर हवामान ढगाळ राहणार असून काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो.

------------------------------------------------------------------

अन्य बातम्या

बीडमध्ये पैशाचा महापूर..पैसे वाटताना एकाला रंगेहाथ पकडले, डिक्कीत सापडली रोकड

जॉनसन बेबी पावडरमुळे कॅन्सरचा धोका? कंपनीने परत घेतले 33 हजार डबे

लीवर सिरोसिस आजाराशी लढतायेत बिग बी, जाणून घ्या याची लक्षणं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 04:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading