मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Rain Alert : विदर्भात अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा; 'या' जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Alert : विदर्भात अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा; 'या' जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा येथे काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे.

दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा येथे काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे.

दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा येथे काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे.

  • Published by:  Rahul Punde
नागपूर, 8 ऑगस्ट : हवामान खात्याने विदर्भातील अनेक भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, येथील प्रादेशिक हवामान केंद्राने सोमवार आणि मंगळवारी गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदियाच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवार ते बुधवार या कालावधीत विदर्भातील गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता असून या संदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार ते म्हणाले की, पुढील पाच दिवस नागपूर, भंडारा, अकोला, बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा येथे काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानुसार अकोला, वाशीम, यवतमाळ आणि अमरावती येथे काही ठिकाणी आणि भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात सकाळी 8.30 वाजेपर्यंत नागपूरमध्ये 108.7 मिमी, वर्धा 100.4 मिमी, गडचिरोलीमध्ये 83.4 मिमी आणि यवतमाळमध्ये 61 मिमी पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी खास स्पर्धा; 50 हजार रूपये जिंकण्याची संधी! VIDEO अनेक गावांचा संपर्क तुटला दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. यावेळी दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी ही माहिती दिली. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, राज्याच्या किनारी जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये, प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये सोमवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 24 तासांत 200 मिमी पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावे व वस्त्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दोन्ही जिल्ह्यांतील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून शेतात पाणी शिरल्याने व रहिवासी भागातील घरांनाही याचा फटका बसल्याचे ते म्हणाले.
First published:

Tags: Rain fall, Weather forecast

पुढील बातम्या