मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Weather Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह राज्यात पाऊस थैमान घालणार हवामान खात्याकडून माहिती

Weather Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह राज्यात पाऊस थैमान घालणार हवामान खात्याकडून माहिती

विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. काही तासांसापून मुंबई आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरू आहे. (Weather Maharashtra Rain)

विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. काही तासांसापून मुंबई आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरू आहे. (Weather Maharashtra Rain)

विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. काही तासांसापून मुंबई आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरू आहे. (Weather Maharashtra Rain)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 24 सप्टेंबर : मागच्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. काही तासांसापून मुंबई आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मुंबई शहरासह दादर, रावळी कँप यासह अन्य भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आज (दि.24) आणि उद्या (दि.25) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात 27 सप्टेंबर पर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. काल (दि.23) शुक्रवारी कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

हे ही वाचा : 'या' पद्धतीनं करा घटस्थापना, पाहा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी, Video

दरम्यान, आज शनिवारी (दि. 24) अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 2 दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि उपनगरांत मुसळधार

मुंबई व शहरात शुक्रवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सकाळी पुन्हा हजेरी लावली. सकाळी 7 ते 8 या तासाभरात रावळी कॅम्प येथे सर्वाधिक 28 मिमी तर सायन माटुंगा येथे 21 मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व पश्चिम उपनगरातही तासाभरात मुसळधार पाऊस झाला.

मुंबईत गेल्या दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या पावसाने काल (शुक्रवार) थोडी उसंती घेतली. सकाळी आकाश निरभ्र असल्यामुळे ऊन पडले होते. अधून मधून पडलेली एखादी सर वगळता संपूर्ण दिवसभर पाऊस नव्हता. दरम्‍यान आज (शनिवार) पहाटेपासून पुन्हा पावसाने मुंबईत हजेरी लावली.

हे ही वाचा : शाळा सुटली अन् 13 वर्षांची श्रद्धा जीवाला मुकली, घरी येताना ट्रॅक्टरखाली सायकल सापडली

सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस झाला. काही सकल भागात पाणी साचले होते, मात्र याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र पावसामुळे वाहतूक काही प्रमाणात मंदावली होती. पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या (लोकल) मात्र वेळापत्रकानुसार सुरू होत्या.

First published:

Tags: Monsoon, Mumbai rain, Pune rain, Rain in kolhapur, Weather forecast, Weather update, Weather warnings