मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी; 'या' 11 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट

मुंबईसह उपनगरांमध्ये साधारण 6 तासांपासून पावसानं जोर धरला आहे. तर पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 07:05 AM IST

मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी; 'या' 11 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट

मुंबई, 25 सप्टेंबर: मुंबईसह उपनगरांमध्ये साधारण 6 तासांपासून पावसानं जोर धरला आहे. तर पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्हात पुढील दोन तासात वीजाच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. पहाटेपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांची पुरती दाणादाण उडाली आहे. तर अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दोन ते तीन तास काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूप पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

कोकण किनापट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तर दोन दिवस मुंबईसह उपनगरात पावसानं उसंत घेतली होती. बुधवारी पाहाटेपासून पुन्हाएकदा मुंबईसह उपनगरांमध्ये वीजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर परिसरात पुढील 48 तास कोसळधार राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

ठाणे जिल्ह्यातही विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस आहे. पहाटेपासून पावसाचा जोर असल्यानं सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर भिवंडीतही पावसानं जोर धरला आहे.

Loading...

कोल्हापूर शहराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. कोल्हापूर शहरात अचानकपणे मुसळधार पाऊस पडला. निपाणी, इचलकरंजी, वारणा, गडहिंग्लज आणि आजरा या भागातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मग कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांवर पाणी साचलं होतं.

वाशिम शहरासह मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी प्रकल्पात वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे.. असाच जर पाऊस पडला तर त्या भागातील काढणीस आलेलं सोयाबीनचे पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.

साताऱ्याच्या पूर्वेकडील दुष्काळी भाग असलेल्या माण तालुक्यातील शिरवली परिसरात जोरदार पाऊस पडला असून पाच तासात ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. डोंगरातून ओढे नाले गावातील तलाव, नाला बंडीग, चेक डँम,सीसीटी तुडुंब भरुन वाहायला लागले आहेत.

चंद्रपूरमध्येही विजांच्या कडकडाटासह शहरात मंगळवारपासून पावसानं जोर धरला आहे. सुमारे अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस असल्यानं इरई धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने 2 दारवाजे उघडण्यात आले. 1 आणि 7 क्रमांकाची दारे 0.5 मीटरने उघडले असून पाऊस असाच बरसत राहिल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

VIDEO : वंचितशी 'तलाक' घेणाऱ्या जलील यांना आली जाग, आता म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 07:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...