मुंबई, 10 जून: बुधवारी पहिल्या दिवशी पावसानं कहर केला. मुंबईसह (Mumbai Rain) उपनगरात काल दिवसभर पावसाचं थैमान पाहायला मिळालं. दरम्यान पुढील पाच दिवस मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (Weather Forecast) अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विट करुन या संदर्भातली माहिती दिली आहे.
मुंबईसह उपनगरात आज पुन्हा सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे. (Mumbai Rains) हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केलं आहे.
अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता मुंबई ठाणे पालघर रायगड व कोकणात पुढचे ५ दिवस काळजी घ्या Severe weather warnings issued by IMD for coming 5 days for Mah Mumbai Palghar Thane Raigad D1-D3, Hvy to Vry Hvy D3 Raigad Extrem Hvy Thane Mumbai Raigad D4,5 Extrem Hvy Palghar EHRF on D5 pic.twitter.com/irg5IgJToa
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 10, 2021
बुधवारी मुंबईला जोरदार पावसाने झोडपलं. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचल्याच्या घटना दिसून आल्या. काल झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतूकही कोलमडली होती.
हेही वाचा- मालाड इमारत दुर्घटना: मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा
बुधवारी चेंबूर 280.52 मिमी, मानखुर्द, गोवंडी - 248.52 मिमी, घाटकोपर - 21022 मिमी तर कुर्ला परिसरात 231.45 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरात मरोळ येथे सर्वात जास्त म्हणजे 272 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अंधेरी (पूर्व) 271.76 मिमी, मालवणी 253.88 मिमी, गोरेगाव 217.36 मिमी, अंधेरी ( प.) 215.03 मिमी, दहिसर 208.22 मिमी, सांताक्रूझ 207.64 मिमी, वर्सोवा 207.44 मिमी, वांद्रे 86.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain, Palghar, Thane