• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Weather Forecast: अरबी समुद्रात चक्रीवादळ; येत्या 5 दिवसांत पुण्यासह राज्यात पावसाचा इशारा

Weather Forecast: अरबी समुद्रात चक्रीवादळ; येत्या 5 दिवसांत पुण्यासह राज्यात पावसाचा इशारा

Weather Forecast: सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य धोकादायक स्थिती निर्माण झाली असून 16 तारखेला सकाळपर्यंत हे चक्रीवाद (Hurricane warning in Arabian Sea) उग्र रुप घेऊ शकतं.

 • Share this:
  पुणे, 12 मे: देशाच्या पश्चिमेला असणाऱ्या अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य धोकादायक स्थिती निर्माण झाली असून 16 तारखेला सकाळपर्यंत हे चक्रीवादळ (Hurricane warning in Arabian Sea) निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, आणि गोव्याच्या किनारपट्ट्यांना बसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. पण पुढील एक- दोन दिवसात समुद्रातील हवेची दिशा बदलून हे वादळ ओमानकडे सरकेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तुर्तास राज्यावरील चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी राज्यात पुढील पाच विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया याठिकाणी मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्याच्या साथीनं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मुंबई वेधशाळेनं वर्तवली आहे. तर 14 ते 16 मे दरम्यान तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. त्याचबरोबर 16 मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना मुंबई वेधशाळेनं सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. 16 मे रोजी या दोन जिल्ह्यात विजांच्या कडकडासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस पडत असताना घराबाहेर किंवा मोकळ्या जागेत न येण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त उत्तर आणि दक्षिण गोव्यात पुढील तीन ते चार दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी 40 ते 60 किमी प्रतितास वेगानं वारा वाहू शकतो. हे वाचा-Proning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं? चक्रीवादळाची स्थिती भारतीय हवामान खात्यानं नुकत्याच जारी केलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास दक्षिण पूर्व अरबी समुद्र, कोमोरीन, मालद्वीव आणि लक्षद्विप याठिकाणी मोठ्या प्रमाणात ढग दाटले आहेत. याच परिसरात 16 मे रोजी चक्रीवादळ निर्माण होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या वादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नसला तरी परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अरबी समुद्रात मच्छेमारीसाठी गेलेल्या बोटींना आज रात्रीपर्यंत किनारपट्टीवर येण्याचा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: