• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Weather Forecast: राज्यात आणखी 2 दिवस पाऊस; पुण्यासह या जिल्ह्यांत बरसणार वरुणराजा

Weather Forecast: राज्यात आणखी 2 दिवस पाऊस; पुण्यासह या जिल्ह्यांत बरसणार वरुणराजा

Weather Forecast: पुढील आणखी 2 दिवस राज्यात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 • Share this:
  पुणे, 02 मे: मागील काही दिवसांपासून राज्यात पूर्व मोसमी पावसानं सपाटाच लावला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना तर अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अद्यापही राज्यातील अवकाळी पावसाचं सावट दूर झालेलं नाही. पुढील आणखी 2 दिवस राज्यात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. काल पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं आहे. नाशिकजवळील लासगाव परिसरात काल पडलेल्या पावसामुळं कांदा पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पीकांवर ताडपत्री अथवा इतर प्लॅस्टिकचं आवरण झाकावं असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील आणखी दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा धोका राहाणार आहे. आज आणि उद्या पुण्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, अहमदनगर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात विजांच्या गडगडाटाच्या साथीनं मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हे ही वाचा-वाफ घेण्याने Covid-19 पासून बचाव होतो? Reuters चं Fact check काय सांगतं पाहा अशातच ऐन एप्रिलच्या महिन्यात अशाप्रकारे पाऊस पडत असल्यानं नेमका कोणता ऋतू सुरू आहे, याबाबत शंका उपस्थित झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पूर्व मोसमी पावसाचा मान्सूनवर काही परिणाम होईल का? याबाबतचा संभ्रमही शेतकऱ्यांच्या मनात सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होतं असली तरी याचा मान्सूनवर काहीही परिणाम होणार नाही, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: