मुंबई, 28 मे: गेल्या आठवड्यात अंदमान निकोबार (Andaman and Nicobar Islands ) बेटांवर नैऋत्य मोसमी वाऱ्याचं (Monsoon) आगमन झालं आहे. तर येत्या तीन दिवसांत केरळातही मान्सून (Monsoon will arrive soon in kerala) दाखल होण्याची शक्यता आहे. अशा स्थित महाराष्ट्रात मान्सून (maharshtra monsoon) दाखल व्हायला अद्याप दोन आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. तत्पूर्वी पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता (Rain Alert)हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
30 मे 2021 पासून ईशान्येकडील राज्यांसह दक्षिण-पूर्वेकडील सर्व राज्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या तीव्र वाऱ्यामुळे महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, केरळ या राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर 31 मे ते 1 जून दरम्यान उत्तरेकडील राज्यांतही मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
♦ Due to strengthening of southerly winds, fairly widespread to widespread rainfall activity with isolated heavy falls very likely over Northeastern states and adjoining East India from 30th May, 2021.@ndmaindia pic.twitter.com/u1L8e27AOG
— India Meteorological Department (@Indiametdept) May 28, 2021
पुढील पाच दिवस विदर्भात पावसाची स्थिती
ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये येऊन धडकलेल्या यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विदर्भात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यादिवशी विदर्भात 30 ते 40 किमी प्रतितास इतक्या वेगाने वारा वाहणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा, तसेच घराबाहेर पडताना हवामानाची स्थिती लक्षात घेऊन बाहेर पडावं असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
Next 5 days weather warning for Vidarbha Dated 28-05-2021 #weatherwarning #imdnagpur #imd pic.twitter.com/UaiNuL1v89
— Regional Meteorological Centre, Nagpur (@RMC_Nagpur) May 28, 2021
हे ही वाचा-कोरोनाविरोधातील लढ्यात गेम चेंजर ठरणार Nasal Spray? 99.99 टक्के प्रभावी असल्याचा दावा
उद्या (29 मे) विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अकोला, नागपूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यात उद्या 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forecast, Weather update