मुंबई, 29 मे: भारतात पावसाळा ऋतुसाठी कारणीभूत असलेले नैऋत्य मोसमी वारे केरळपासून (Monsoon in Kerala) अवघ्या काही किमी अंतरावर येऊन ठेपले आहेत. कोणत्याही क्षणी केरळात मान्सूनचं आगमन होऊ शकतं. यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा अगोदर केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात मान्सून (Monsoon in Maharashtra) दाखल होण्यास आणखी 10-12 दिवसांचा कालावधी लागू शकतो.
असं असताना राज्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा (Heat wave in maharashtra) जाणवत आहेत, तर काही ठिकाणी पावसाची (Rain alert) स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस राज्यात पावसाची स्थिती असणार आहे. तर राजस्थानासह विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटा सहन कराव्या लागणार आहेत.
Severe weather warnings by IMD for coming 5 days in Maharashtra. Likely of vry active weather mostly TS🌩, lightning & mod rains. Pl watch for nowcast by IMD.Use of Damini App will good guidance on lightning.@RMC_Mumbai @RMC_Nagpur S Konkan, Goa, parts of Madhya Mah now 🌩🌩 pic.twitter.com/qLlHzKXL5M
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 29, 2021
येत्या पाच दिवसांत पुण्यासह, कोल्हापूर, सांगली, सातारा, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर सध्या दक्षिण कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे.
♦ Scattered Heat Wave conditions with isolated severe heat wave very likely over West Rajasthan on 29th and scattered heat wave conditions on 30th. Isolated heat wave conditions also likely over East Rajasthan, south Punjab, south Haryana and Vidarbha on 29th & 30th.@ndmaindia pic.twitter.com/1XtjMmwdYK
— India Meteorological Department (@Indiametdept) May 29, 2021
हे ही वाचा-UK मध्ये तिसऱ्या लाटेचा धोका, भारतावर काय होणार परिणाम?
विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याशिवाय 29 आणि 30 मे रोजी पूर्व राजस्थान, दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा आणि विदर्भात उष्णतेची तीव्रता जाणवणार आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी पुन्हा विदर्भकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Weather, Weather forecast