पुण्यातील अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; सद्यस्थितीचा आढावा घेणारा GROUND REPORT

पुण्यासह राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल; घरांमध्ये चिखल आणि पाण्याचं साम्राज्य.

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 11:17 AM IST

पुण्यातील अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; सद्यस्थितीचा आढावा घेणारा GROUND REPORT

पुणे, 26 सप्टेंबर: पुणे जिल्ह्यासह ग्रामीण भागात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.आंबेगाव परिसरात बुधवारी रात्री रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी होतं. या पाण्याचा अंदाज न आल्याने काही खाजगी बस आणि चारचाकी वाहनं पाण्यात अडकून पडली. आता हळूहळू या रस्त्यावरील पाणी ओसरतंय. जमा झालेला चिखल आणि बंद पडलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.कात्रज तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर आलं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बिबवेवाडी लेक टाऊन परिसरीतील जवळपास 25 वाहानं वाहून गेली आहेत.

कात्रज तलाव ओव्हरफ्लो झाल्याने अनेक इमारतींच्या सुरक्षाभिंती कोसळल्या. तर गॅस पाईपलाईन फुटल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुण्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक जनावरंही मृत्युमुखी पडलीत. अचानक आलेल्या पुरामुळं परिसरात हाहाकार उडाला होता.गोदावरीला पूर आल्याने बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या राक्षस भुवनचं शनी मंदिर आणि पांचाळेश्वर मंदिर पाण्यात गेलं आहे. बीड जिल्ह्यातल्या 32 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कारण पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर जायकवाडीतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नाथसागरचेही 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीपात्रात कुणीही उतरू नये, वाहनं, जनावरं पात्रात उतरवू नयेत असं आवाहन करण्यात आलं आहे.

नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झाल्यामुळे नाझरे धरणातून 85 हजार क्युसेक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे क-हा नदीच्या लगतची सर्व गावं आणि बारामती शहरात नदीलगत सर्व ठिकाणी रेड अलर्ट देण्यात येतोय. सर्व नागरिकांनी आणि प्रशासकीय यंत्रणांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहावं असा रेड अलर्ट प्रशासकीय यंत्रणांना देण्यात येतोय. मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने संपूर्ण नाझरे गावातील नदी काठच्या कुटुंबांनासुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 10:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...