महाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता

महाराष्ट्रात सध्या काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडताना दिसत आहे. अशातच हवामान खात्यानं महाराष्ट्रातील पावसाबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

  • Share this:

पुणे, 20 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सध्या काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडताना दिसत आहे. अशातच हवामान खात्यानंही महाराष्ट्रातील पावसाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. पुढच्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, सोलापूर आणि सांगलीतल्या दुष्काळी पट्ट्यात अवकाळीची पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे दुष्काळाच्या झळा सोसत असणाऱ्या शेतकऱ्यांना काही काळ तरी दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे, वाशिम जिल्ह्याच्याही अनेक भागात पावसानं हजेरी लावली. सकाळी सहा वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडला. हा पाऊस रब्बी पिकांसाठी फायद्याचा ठरणार असल्यानं शेतक-यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं.

ऑगस्ट अखेरपासून  दडी मारून बसलेला पाऊस तब्बल 3 महिन्यानंतर बरसला.  सकाळी 6 वाजल्यापासून जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली. यामुळे काही काळासाठी का होईना शेतकऱ्याची चिंता दूर झाली आहे.

VIDEO : विहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ

First Published: Nov 20, 2018 01:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading