मुंबई, 11 सप्टेंबर : राज्यभरात पावसाने (maharashtra rain) धुमशान घातले आहे. मुंबई (Mumbai rain), ठाण्यासह मराठवाडा आणि विदर्भापर्यंत सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा (heavy rains) इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचा इशारा हवामान खात्याने दिले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे परिसरात हलक्या पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे, आजपासून पुढील पाच दिवस कोकण, घाट परिसर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Alert! 19 हजारहून अधिक Apps मध्ये आढळल्या मोठ्या त्रुटी, या गोष्टी लक्षात ठेवाच
हवामान खात्यानं आज कोकण, घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं आज पुणे रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना IMD कडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बिअर मिळाली पण नोकरी गेली; दारूच्या नशेत नग्न होऊन सुपरमार्केटमध्ये पोहोचला
जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain