मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुन्हा एकदा आभाळ काळवंडलं; जोरदार पावसाचा 3 जिल्ह्यांना अलर्ट

पुन्हा एकदा आभाळ काळवंडलं; जोरदार पावसाचा 3 जिल्ह्यांना अलर्ट

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उद्या जोरदार पाऊस राहाणार आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उद्या जोरदार पाऊस राहाणार आहे.

पुढच्या 24 ते 48 तासांत 3 जिल्ह्यांंना मान्सून झोडपून काढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई, 11 ऑगस्ट : गेल्या आठवड्यात धुवांधार कोसळलेला मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा राज्यावर दाटून आला आहे. पुढच्या 24 ते 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपून काढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस आणि जोरदार वाऱ्यांनी मुंबईची (Mumbai Rain) अवस्था दयनीय करून टाकली होती. आता मुंबईसह कोकणात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाने (Weather alert) सांगितलं आहे.

मुंबईत गेल्या आठवड्यात अतिमुसळधार पाऊस झाला. मुंबईबरोबरच ठाणे, रायगड आणि संपूर्ण कोकणात पावसानं थैमान घातलं. पश्चिम महाराष्ट्रातही दमदार पाऊस झाला होता. मागचे दोन-तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली आणि आता पुन्हा मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे.

सॅटेलाईट इमेजवरून पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी झालेली स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे पूर्ण किनारपट्टी भागात पुढच्या दोन दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. या तीनही जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. मुंबईतही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

First published:

Tags: Mumbai rain, Weather warnings