मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Weather Alert: कोकणात मान्सूनची रिपरिप सुरूच; आज या शहरांत मुसळधार पावसाची शक्यता

Weather Alert: कोकणात मान्सूनची रिपरिप सुरूच; आज या शहरांत मुसळधार पावसाची शक्यता

विकेंडनंतर राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

विकेंडनंतर राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Weather Alert: सध्या राज्यात मान्सूनच्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पण कोकणात मात्र पावसाची रिपरिप सुरूच आहे. आज राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

रायगड, 25 जून: जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात मान्सूनचा (Monsoon) वाढलेला जोर आता काहीसा कमी झाला आहे. राज्यात पुढील आणखी आठ दिवस पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. पण पुढील तीन ते चार तासांत राज्यातील काही भागांत मात्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसानं दडी दिली असली, तरी कोकणात मात्र अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे.

पुढील तीन ते चार तासात राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडेल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. सध्या पालघर, डहाणू, शहापूर, मुरबाड, रोहा, रायगड, अलिबाग, मोडकसागर, रत्नागिरी, दापोली, हरणाई, दक्षिण कोकण परिसरात मोठ्या प्रमाणात मान्सूनचे ढग साचले आहेत. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.

कोकणात आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, तर इतर भागात सामान्य पाऊस राहिल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. विदर्भात मात्र काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा-तिसऱ्या लाटेत कशी असेल राज्यातील कोरोना स्थिती? इशाऱ्यानंतर सरकार लागलं कामाला

वास्तविक, पुढील पूर्ण आठवड्यासाठी हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी तो काही तुरळक ठिकाणी पडेल, असं सांगण्यात आलं आहे. बहुतांश महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची तर काही भागात उघडीप मिळण्याचीदेखील शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Raigad, Ratnagiri, Weather forecast