• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Weather Alert! साताऱ्यासह महाबळेश्वरला गारपिटीची दाट शक्यता; सांगली, कोल्हापूरला हायअलर्ट

Weather Alert! साताऱ्यासह महाबळेश्वरला गारपिटीची दाट शक्यता; सांगली, कोल्हापूरला हायअलर्ट

Weather Alert: पुढील काही तासांत सातारा आणि महाबळेश्वर याठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तण्यात आली आहे. तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • Share this:
    सातारा, 04 मे: मागील काही दिवसांपासून साताऱ्यासह राज्यात अवकाळी पावसानं (Non seasonal rain) हजेरी लावली आहे. पुढील आणखी काही दिवस राज्यात पूर्व मोसमी पावसाची स्थिती कायम राहणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी गारपीटीसह (Hail with thunderstorm) जोरदार पाऊस झाला आहे. आज पुन्हा सातारा आणि महाबळेश्वर याठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तण्यात आली आहे. तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या सातारा, महाबळेश्वर याठिकाणी मोठ्या प्रमाणात ढग दाटले आहेत. पुढील काही तासांतच सातारा आणि महाबळेश्वरसह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस धडकणार आहे. याठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट आणि पाऊस होण्याची शक्यता मुंबई वेधशाळेनं वर्तवली आहे. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि महाबळेश्वर या भागात राहाणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. वाचा- Weather Alert! पुण्यात आठवडाभर ढगाळ वातावरण; राज्यात शुक्रवारपर्यंत मेघगर्जनेसह गारपीटीची शक्यता सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या कर्नाटक राज्यात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहे. पुढील तीन दिवस (7 मेपर्यंत) राज्यात अवकाळी पावसाची स्थिती कायम राहिल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर पुढील एक आठवडाभर पुण्यातील हवामान ढगाळ राहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published: