• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Weather Alert! पुण्यात आठवडाभर ढगाळ वातावरण; राज्यात शुक्रवारपर्यंत मेघगर्जनेसह गारपीटीची शक्यता

Weather Alert! पुण्यात आठवडाभर ढगाळ वातावरण; राज्यात शुक्रवारपर्यंत मेघगर्जनेसह गारपीटीची शक्यता

Weather Forecast Today: गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी गारपीटीसह (Hail with thunderstorm) जोरदार पाऊस झाला आहे. आणखी तीन दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला (Weather alert) आहे.

 • Share this:
  पुणे, 04 मे: गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसानं (Non seasonal rain) हजेरी लावली आहे. तर राज्यातही पूर्व मोसमी पावसाची स्थिती कायम आहे. गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी गारपीटीसह (Hail with thunderstorm) जोरदार पाऊस झाला आहे. पुढील आणखी तीन दिवस म्हणजेच 7 मे पर्यंत राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला (Weather alert) आहे. तर पुढील आठवडाभर पुण्यात अवकाळी पावसाचे ढग घोंघावणार आहेत. राज्यात सोमवारी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. काल राज्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तर विदर्भासहित कोकण, गोवा या ठिकाणी सौम्य पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी गारपीटही झाली आहे. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा घसरला आहे. परिणाम राज्यात अल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे. सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या कर्नाटक राज्यात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहे. पुढील तीन दिवस (7 मेपर्यंत) राज्यात अवकाळी पावसाची स्थिती कायम राहिल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर पुढील एक आठवडाभर पुण्यातील हवामान ढगाळ राहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हे ही वाचा-कोरोनाचा वेग वाढतोय तर लसीकरणाचा घटतोय, आतापर्यंत किती जणांना मिळाली Vaccine? राज्यासह पुणे घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या काळात वीज कोसळण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ढगाळ वातावरणात विजा कडकडत असताना मोकळ्या वातावरणात न फिरण्याचं आवाहन पुणे हवामान वेधशाळेनं केलं आहे. मागील दोन दिवसात मराठवाड्यासह पुणे जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. रविवारी एकट्या मराठवाड्यात वीज पडल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला होता.
  Published by:News18 Desk
  First published: