विहिंपच्या शोभा यात्रेत एअर रायफल.. शाळकरी मुलींनी हातात मिरवल्या नंग्या तलवारी

विहिंपच्या शोभा यात्रेत एअर रायफल.. शाळकरी मुलींनी हातात मिरवल्या नंग्या तलवारी

विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत शाळकरी मुलींनी हातात तलवारी मिरवल्या. एवढेच नाही तर शोभा यात्रेत एअर रायफलचे ट्रिगर दाबताना मुली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

गोविंद वाकड (प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड, 03 जून- विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत शाळकरी मुलींनी हातात तलवारी मिरवल्या. एवढेच नाही तर शोभा यात्रेत एअर रायफलचे ट्रिगर दाबताना मुली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विनापरवाना काढलेल्या या शोभायात्रेवर पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर आणि 200 ते 250 कार्यकर्त्यांचा गुन्ह्यात समावेश आहे.

रविवारच्या सायंकाळी 5 ते रात्री 10 च्या दरम्यान सुरू असलेल्या शोभा यात्रेत 200 ते 250 कार्यकर्ते सहभागी झालेले होते. यमुनानगर इथल्या अंकुश चौक ते ठाकरे मैदानादरम्यान दुर्गा वाहिनीची ही शोभा यात्रा काढल्यात आली होती. तेव्हा 4 मुली हातात तलवार आणि एअर रायफल घेऊन आढळल्या. यावेळी रायफलचा ट्रिगर दाबल्याने मोठा आवाजही झाला. तसेच पाच मुली हातात तलवारी मिरवत असल्याचेही दिसून आले. याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वापरलेली शस्त्र बोथट..बंदुकाही खोट्या..

दुसरीकडे मात्र विहीपकडून या शोभा यात्रेचे समर्थन करण्यात आले आहे. एवढेच नाहीतर शोभा यात्रेत वापरलेली शस्त्र बोथट आणि बंदुका खोट्या असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे हे कायद्याला धरून नसल्याचे विहीप जिल्हामंत्री नितीन वाटकर यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे राज्यातील वाढती गुन्हेगारी पाहता तरुणींना शस्त्र पारंगत करणे गरजेचे असल्याने मत देखील नितीन वाटकर यांनी केले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये वाटकर यांच्याही नावाचा समावेश आहे.

VIDEO:विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत मुलींनी मिरवल्या तलवारी आणि एअर रायफल

First published: June 3, 2019, 6:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading