रायगड, 25 ऑगस्ट: मंगळवारी रात्री उशिरा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नारायण राणे यांना जामीन देण्यात आलाय. मात्र, 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत नारायण राणे यांना हजेरी लावावी लागणार आहे. अशातच कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नसल्याचं महाड कोर्टानं राणेंना बजावलं. जामीन मिळाल्यानंतर रात्री 12 च्या सुमारास राणे कोर्टाच्या बाहेर आले. मात्र त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) उपस्थित होते. त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. प्रवीण दरेकर यांनी राणेंच्या पुढील कार्यक्रमासह जन आशीर्वाद यात्रेची (Jan Aashirwad yatra) माहिती दिली आहे.
गुरुवारपासून पुन्हा भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार असल्याची माहिती दरेकरांनी दिली.
Maharashtra | Mahad Magistrate Court has granted bail to Union Minister Narayan Rane (in connection with his alleged statement against Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray). We will start our Jan Ashirwad Yatra the day after tomorrow: Pravin Darekar, BJP pic.twitter.com/wL3Bn1uDmX
— ANI (@ANI) August 24, 2021
नारायण राणे आता मुंबईला जाणार आहे. तिथे एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते गुरुवारपासून रत्नागिरीमधून पुन्हा जन आशीर्वाद यात्रा सुरु करतील, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. नारायण राणे सपत्नीक मुंबईला रवाना झालेत. तिथे राणे यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाणार असल्याचं दरेकरांनी यावेळी सांगितलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी
नारायण राणेंच्या अटकेनंतर राणे कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली. नारायण राणे यांच्या अटकेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतला. जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 पासून 7 दिवसांची संचारबंदी लावण्यात आली.
''नारोबा राणे'', सकाळ सकाळ शिवसेनेची महत्त्वाची प्रतिक्रिया
त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली तरीही जनआशीर्वाद यात्रा चालू होणार. काय करता बघू, असं थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane, Pravin darekar