आमच्याकडे ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, अजित पवारांचा खोचक टोला

आमच्याकडे ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, अजित पवारांचा खोचक टोला

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी कॉग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता

  • Share this:

मुंबई, 13 मार्च : भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर मोठं विधान केलं होतं. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असं विधान करीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा दिला दिला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमच्याकडे कुणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, अशा शब्दात उत्तर दिलं आहे.

संबंधित - आमच्याच पक्षाच्या नेत्यांकडून शब्द फिरवला गेला', सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर

अजित पवारांचं प्रत्युत्तर...

“राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईल अंस म्हणत पुढची पाच वर्ष तिथं काढलीत तरी चालतील. असं सांगतंच तुम्हाला सगळं सांभाळून घ्यावं लागणार आहे. नाही तर तुमचीच माणसं इकडे तिकडे जातील. आमच्याकडे कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तुमच्याकडे होणार नाही याकडे लक्ष ठेवा, अशा शब्दात त्यांनी मुनगंटीवारांना प्रत्युत्तर दिलं. सध्या विधानसभेत बरेच जण गैरहजर आहेत, त्यांच्याकडे लक्ष ठेवा,” असं खोचकं विधान अजित पवार यांनी यावेळी केलं.

काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार...

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आम्ही जे काही ठरविले होते, त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारकत घेतली. त्यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी फारकत घेतली, असं धक्कादायक विधान माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. आमच्या चुकीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला, असा घरचा आहेर मुनगंटीवार यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना दिला आहे. आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच. राज्याच्या अर्थसंकल्पावर सुरू असलेल्य़ा चर्चेत मुनगंटीवार बोलत होते.

हे वाचा - पुण्यातील गाडगीळ सराफ 50 कोटी खंडणी प्रकरण, अजित पवारांच्या निकटवर्तीयांची चौकशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2020 03:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading