मोठी बातमी: महाराष्ट्रात भाजप सत्ता स्थापन करणार नाही, चंद्रकांत पाटलांची घोषणा

मोठी बातमी: महाराष्ट्रात भाजप सत्ता स्थापन करणार नाही, चंद्रकांत पाटलांची घोषणा

'शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्यासोबत आली नाही. त्यामुळे आम्ही आता सत्ता स्थापन करणार नाही.'

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : 'नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत देत जनादेश मिळाला. त्यामुळे राज्यपालांनी नव्यानं सत्ता स्थापन करण्यास आम्हाला सांगितले. मात्र असे असले तरी शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्यासोबत आली नाही. त्यामुळे आम्ही आता सत्ता स्थापन करणार नाही,' अशी मोठी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

राज्यपालांच्या निमंत्रणानंतर भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर दुसरा मोठा पक्ष असलेली शिवसेना सत्तेवर दावा करण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना चंद्राकांत पाटील म्हणाले की, 'जनादेशाचा अपमान करून सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा.'

शिवसेना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडे प्रस्ताव देणार?

सध्या शिवसेनेच्या आमदारांना मालाडमध्ये द रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याठिकाणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, गजानन कीर्तिकर, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, अनिल देसाई यांनी काल रात्री उशिरा हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली आहे. तर आज उद्धव ठाकरेही आमदारांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.

सेना आमदार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक इथे पार पडणार आहे. एकीकडे काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या अनुषंगाने शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेत भाजपला धक्का देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, भाजपसोबत युतीत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना इच्छुक नसल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

'काँग्रेस आमचा दुश्मन नाही'

काँग्रेस राज्याचा दुश्मन नाही असं शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत असा दावाही त्यांनी केला. राज्यतली अस्थिरता संपावी अशीच शिवसेनेची भूमिका असल्याचंही ते म्हणालेत. राष्ट्रवादीकडे चांगले नेते होते आणि आहेत असंही राऊत म्हणालेत. राऊतांच्या काँग्रेसबद्दलच्या विधानामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलं आहे.

VIDEO : राज्यपाल तसा निर्णय घेऊ शकत नाही? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 06:18 PM IST

ताज्या बातम्या