31 जानेवारीपर्यंत रेल्वेचे 3 ब्रिज लष्कर बांधून देणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

31 जानेवारीपर्यंत रेल्वेचे 3 ब्रिज लष्कर बांधून देणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

एल्फिन्स्टन रोड पूल, करी रोड पूल आणि आंबिवलीचा पूल बांधण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय

  • Share this:

31 ऑक्टोबर: 31 जानेवारी पर्यंत रेल्वेचे तीन पादचारी पूल बांधून पूर्ण करू असं आश्वासन आज मुख्मंत्र्यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यासोबत रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि संरक्षणमंत्री निर्मल सीतारमन उपस्थित होत्या.

एल्फिन्स्टन रोड पूल, करी रोड पूल आणि आंबिवलीचा पूल बांधण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. एल्फिन्स्टन रोडचा पूल बांधण्यासाठी मिलिटरी फोर्सचा वापर केला जाणार आहे लष्कराची मदत घेऊन हा पूल लवकरात लवकर कसा बांधता येईल याचा प्रयत्न होणार आहे.याचसंदर्भात आज रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री पाहणी केली आहे.

एल्फिन्स्टन पूलाचा आराखडा लष्कराचे अधिकारी घेऊन आले आहेत. पण विशेष म्हणजे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांना याबद्दल काहीच माहीत नाही. यावरून आता नवं राजकारण सुरू व्हायची चिन्हं आहेत.  एल्फिन्स्टन ब्रिजच्या दुर्घटनेत २3 निष्पाप बळी गेले होते. या दुर्घटनेनंतर रेल्वे पूलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सरकारला होणाऱ्या त्रिवर्षपूर्तीच्या निमित्ताने यासंबंधी रेल्वे मंत्री काही घोषणा करण्याची शक्यता आहे. एलफिन्स्टन रोड स्थानकाबाहेरही अनेक समस्या आहेत. तिथे फेरीवाले, अन्नाचे स्टॉलवाले, टॅक्सी उभ्या असतात. बेस्टची बसही तिथूनच जाते. रस्तेही छोटे आहेत. त्यामुळे स्थानकातून सुरक्षित बाहेर पडलं तरी बाहेर मुख्य रस्त्याला लागेपर्यंत नागरिकांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं.

 

First published: October 31, 2017, 11:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading