मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /घरगुती कार्यक्रमात शरद पवारांबद्दल चुकून बोललो, चंद्रकांत पाटलांची सारवासारव

घरगुती कार्यक्रमात शरद पवारांबद्दल चुकून बोललो, चंद्रकांत पाटलांची सारवासारव

'शरद पवार साहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी कधीही त्यांचा अनादर केला नाही'

'शरद पवार साहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी कधीही त्यांचा अनादर केला नाही'

'शरद पवार साहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी कधीही त्यांचा अनादर केला नाही'

नांदेड, 18 ऑक्टोबर : भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल ऐकरी भाषा वापरली होती  त्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर बरीच टीका झाली. अखेर, 'आपण एका खासगी कार्यक्रमात होतो, त्यावेळी शरद पवार यांच्याबद्दल चुकून बोललो', असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सारवासारव केली.

नांदेडमधील देगळूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये गेल्याने भाजपा चांगलाच धक्का बसला आहे. खतगावकर यांच्या निर्णयानंतर भाजपाचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील सोमवारी तातडीने देगलूरला आले. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिलं.

'पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना शरद पवार यांच्याबद्दल चुकून बोललो.  शरद पवार साहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी कधीही त्यांचा अनादर केला नाही. मुळात तो एक छोट्या कार्यक्रम होता. भाजपच्या विजयी उमेदवारांचा सत्काराचा कार्यक्रम होता. मोजकेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थितीत होते, अशी सारवासारव चंद्रकांत पाटील यांनी केली.

क्राईम सिरीज पाहून केली राजन शिंदेंची हत्या, अखेर 7 दिवसांनी मारेकरी सापडला!

'मी याआधी शरद पवार यांच्याबद्दल अनेकवेळा चांगलं बोललो आहे, मी त्यांची प्रशंसा केली आहे. प्रमोद महाजन यांनी त्यांच्याबद्दल आम्हाला सांगितलं आहे, राजकारणाचा त्यांचा अनुभव खूप मोठा आहे, त्यांच्याबद्दल टीव्हीवर अनेक वेळा चांगलं बोललो आहे, त्यांच्याही व्हिडीओ क्लिप बघाव्या, असंही पाटील म्हणाले.

'एका वाक्याचा इतका बाऊ संजय राऊत यांनी करू नये. मी जर  उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोललो तर राऊत यांनी बोलावं. पण याचा अर्थ पवार साहेब हे राऊत यांचे सर्वेसर्वा आहेत, उद्धव ठाकरे नाहीत, असा चिमटा देखील चंद्रकांत पाटील यांनी काढला.

First published:
top videos

    Tags: Chandrakant patil