मुंबई, 23 मार्च : महाराष्ट्रातील नागरी भागात कलम 144 लागू केल्यानंतरही कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या वाढत आहे. त्यामुळे काही प्रमाणात चिंताजनक वातावरण तयार होत आहे. मात्र अशातच आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. 'महाराष्ट्रात अद्याप कोरोनाचा सामुहिक संसर्ग (community spread phase) झालेला नाही,' असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
'आपण अद्याप सामुहिक संसर्गाकडे गेलेलो नाही, हे मी आधी स्पष्ट करू इच्छितो. आतापर्यंत महाराष्ट्रात 89 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये नव्याने समोर आलेले मुंबईतील 14 तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. ज्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, त्यातील बहुतांश लोक परदेशातून आले आहेत, तर काही जण कोरोनाबाधितांच्या थेट संपर्कात आल्याने त्यांना संसर्क झाला आहे,' अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
I want to make it very clear that we have not entered the community spread phase; There are total 89 positive Coronavirus cases in the state including 14 new cases in Mumbai and 1 in Pune: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/IKWTvLMf1c
— ANI (@ANI) March 23, 2020