मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'भाजप नव्हे सेनेमुळेच निवडून आलो', 24 तासांत सेना आमदाराचे स्पष्टीकरण

'भाजप नव्हे सेनेमुळेच निवडून आलो', 24 तासांत सेना आमदाराचे स्पष्टीकरण

'उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि 2014 मध्ये 75 हजार मते शिवसेना उमेदवार म्हणून मला मिळाली. 2019 साली मी शिवसेनेमुळेच पुन्हा आमदार झालो'

'उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि 2014 मध्ये 75 हजार मते शिवसेना उमेदवार म्हणून मला मिळाली. 2019 साली मी शिवसेनेमुळेच पुन्हा आमदार झालो'

'उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि 2014 मध्ये 75 हजार मते शिवसेना उमेदवार म्हणून मला मिळाली. 2019 साली मी शिवसेनेमुळेच पुन्हा आमदार झालो'

पंढरपूर, 10 जानेवारी : 'महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva government) आपल्याला कुणी विचारत नाही, भाजपच्या (bjp) पाठिंब्यावर निवडून आलो' असं वक्तव्य करून शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील (shivsena MLAs shahaji bapu patil) यांनी खळबळ उडवून दिली होती. पण आता, 'आपण कडवे शिवसैनिक आहोत. मरेपर्यंत माझी निष्ठा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला' असं सांगत पाटील यांनी वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील हे मनमोकळ्या थेट वक्तव्य करत असतात. अशाच पद्धतीने दोन दिवसांपूर्वी त्यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना शहाजी पाटील यांनी सरकारलाच घरचा अहेर देऊन टाकला. आपल्या विधानामुळे वाद झाल्यानंतर आज पाटील यांनी यावर खुलासा केला.

(IND vs SA : चुकीला माफी नाही! धोनीचा 'गुरूमंत्र' देऊन कोहलीचा पंतला इशारा)

परवा हॉस्पिटलच्या कार्यक्रमामध्ये मी जे बोललो त्याचा दुर्दैवाने विपर्यास झाला आहे. मी शिवसेनेवर नाराज आहे, असं सांगण्यात आलं. पण, हे अत्यंत चुकीचं आणि निराधार आहे. मी राष्ट्रवादीचे नेते बबनराव शिंदे यांच्याबद्दल बोललो होते. घर की मुर्गी दाल बराबर हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्याबद्दल बोललो. निदान त्यांनातरी संधी मिळायला हवी होती. ते 30 वर्ष आमदार आहेत. पण, शिंदे यांच्यावर बोललेलं विधान माझ्याबाबतीत लावण्यात आलं आणि मी शिवसेनेवर नाराज असल्याचं दाखवण्यात आलं हे चुकीचं आहे, असा खुलासा पाटील यांनी केला.

तसंच, 'शिवसेना हा माझा आवडीने निवडलेला पक्ष आहे. मी काँग्रेसचा ३० वर्षांचा लहान कार्यकर्ता होतो. माझे पक्षात कुणासोबतही मतभेद नव्हते. पण, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा टीव्हीवर पाहिली आणि भावना विवश झालो. आणि मी माझ्या पत्नीला शब्द दिला होता सेनेकडून निवडणूक लढवणार आहे. मी शिवसेनाभवनात दाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांना विनंती केली. त्यांनी माझा आनंदाने स्विकार केला आणि मी शिवसेना प्रवेश केला, असंही पाटील म्हणाले.

(लिंगबदल केलेल्या अशा नेत्या ज्यांचा दक्षिण भारतातील राजकारणात आहे दबदबा)

'जो 1100 मतांचा उल्लेख केला जात आहे तो चुकीचा आहे.  2009 मध्ये रघुनाथ पाटील यांच्या कार्यकर्त्याकडे उमेदवारी गेली होती, त्यामुळे शिवसेनेला 1100 मते होती. पण उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि 2014 मध्ये 75 हजार मते शिवसेना उमेदवार म्हणून मला मिळाली. 2019 साली मी शिवसेनेमुळेच पुन्हा आमदार झालो, असा खुलासाही पाटील यांनी केला.

'2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती होती. त्यावेळी भाजप हा मित्रपक्ष होता. कुठे भाजपने शिवसेनेला मदत केली. त्यामुळे ओघात बोलून गेलो. मी मरेपर्यंत उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात 240 कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. आपली निष्ठा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच असेल, असं सांगत पाटील यांनी या वादावर पडदा टाकला आहे.

First published: