तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित...पुणे पोलिसांच्या जनसेवेला कडक सॅल्यूट!

देशातील लाखो पोलीस कर्मचारी जीवाची बाजी लावून देशसेवा करीत आहे.

देशातील लाखो पोलीस कर्मचारी जीवाची बाजी लावून देशसेवा करीत आहे.

  • Share this:
    पुणे, 10 एप्रिल :  सध्या देशात कोरोनाचा (Covid - 19) कहर वाढत आहे. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधित कोरोनाबाधित (Coronavirus) व मृत्यूंचा आकडा मोठा आहे. यातही मुंबई - पुण्याची (Mumbai - Pune) परिस्थिती ह्रदय हेलकावणारी आहे. अशा कठीण प्रसंगी पोलीस प्रामाणिकपणे आपली कर्तव्य सेवा बजावीत आहे. दुर्देवाने अशा परिस्थितीत देशातून अनेक पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यादरम्यान पुणे ग्रामीण परिसरातील वडगाव मावळ भागातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक पोलीस आपल्या पोलीस बांधवाच्या पायाला मलमपट्टी करीत आहे. सध्या रात्र-दिवस ड्यूटीवर तैनात असल्याने त्यांना खाण्याची उसंत नसते. कोरोना विरुद्धच्या या लढाईत पोलीस बांधव आपल्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उभे असताना वडगाव मावळ पो.स्टे. पुणे ग्रामीण परिसरात घडलेला हा हृदयद्रावक प्रसंग पाहून तुम्हाला भरुन येईल. हा व्हिडीओ करीत असताना मलमपट्टी करणारे आणि करवून घेणारे बांधव त्यांना शूट करू नये असं सांगत आहेत. ही गोष्ट लहान असली तरी याचा अर्थ मोठा आहे. वडगाव मावळचे पोलीस ड्यूटीवर तैनात होते. यावेळी सदाशिव पिरगणवार यांच्या पायाची जखम दुखू लागली. ड्यूटीवर असल्याने रुग्णालयात जाऊन ड्रेसिंग करण्यास वेळ नव्हता. अशावेळी त्यांच्या सहकारी रमेश गुंडेवार यांनी आपले सहकारी सदाशिव पिरगणवार यांच्या पायाला ड्रेसिंग करुन दिली. पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी गुंडेवार यांच्या माणुसकीचे कौतुक करीत हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. संबंधित -7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करुन देशसेवा करतायेत पती-पत्नी       संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे
    First published: