Home /News /maharashtra /

''Omicron वर आम्ही लक्ष ठेऊन आहोत, पण केंद्रानंही...'', अजित पवार संतापले

''Omicron वर आम्ही लक्ष ठेऊन आहोत, पण केंद्रानंही...'', अजित पवार संतापले

ओमायक्रॉनबाबत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

    मुंबई, 06 डिसेंबर: ओमायक्रॉनबाबत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. कोरोना व्हायरसचा (corona virus) नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटनं (Omicron Varient) सर्वांचीच चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रातही या व्हेरिएंटनं (Omicron cases in Maharashtra) शिरकाव केला आहे. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्यानं वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर (State Health Department) आलाय. राज्यात ओमाक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता 8 वर गेली आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. सध्या वेगवेगळ्या देशातून जे येत आहेत त्यांच्याबाबत कडक भूमिका केंद्राने घ्यायला हवं. सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळवर नियमांचं पालन होतं आहे की नाही याकडे लक्ष द्यायला हवं, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. कोरोनाची सुरुवात मुळात भारतात एक जोडपं दुबई वरून आलं होतं आणि त्यांनी प्रवास केल्यानंतर त्यांच्या सोबतच्या ड्राइव्हरला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याचा प्रसार झाला होता, असंही ते पुढे म्हणाले. हेही वाचा- तेरवीसाठी निघालेल्या कुटुंबीयावर काळाचा घाला, अपघातात संपलं अख्खं कुटुंब पुण्यात जे कुटुंबीय बाधित आहेत. त्यामध्ये लहान मुलांना बाधा झाली आहे. त्यामुळे केंद्रानं आणि डब्ल्यूएचओनं याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची नितांत गरज असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणालेत. आत्ताच्या देखील काळात वेगवेगळ्या राज्यात एक दोन रुग्ण सापडत आहेत. देशपातळीवर आरोग्य विभाग आणि डब्ल्यूएचओ नवं नियमांबाबत एक सूचना काढणं गरजेचं आहे. जे दोन डोस घेतलेले आहेत त्यांना लागण झाली आहे. त्यामुळे बूस्टर डोस बाबत देखील केंद्राने निर्णय घ्यायला हवा. आपल्याकडे बूस्टर डोस उपलब्ध असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. हेही वाचा- बिबट्याच्या कातडीची तस्करी, तब्बल 12 जणांच्या आवळल्या मुसक्या  बूस्टर डोस बाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे ज्यांनी याबाबत संशोधन केले आहे त्यांनी स्पष्ट करावे बूस्टर डोस घ्यायचा का नाही ते आणि सोबत का घेण्यात यावा किंवा घेण्यात येऊ नये याचं कारण देखील स्पष्ट करावं, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Ajit pawar, Coronavirus

    पुढील बातम्या