• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'मातोश्री'चं आमंत्रण आम्ही स्विकारलं, भाजप आमदाराचं मोठं विधान

'मातोश्री'चं आमंत्रण आम्ही स्विकारलं, भाजप आमदाराचं मोठं विधान

'समाजा समाजामध्ये तेढ लावण्याचं काम इंग्रजांनी केलं ते ठाकरे सरकार करत आहे म्हणून इंग्रजांना चले जाव म्हणायची वेळ आली तसेच ठाकरे सरकारला चले जावं'

  • Share this:
बीड, 02 जून : भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीस लवकरच मातोश्रीवर येतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे, हा आमंत्रणाचा प्रकार असून आम्ही स्विकारलं आहे, अशी सूचक प्रतिक्रिया भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली. आशिष शेलार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार केसा. 'महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत कुकर्मातील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, मराठा समाजाच्या आरक्षणाचा कोल्ड ब्लडेड मर्डर केलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे. मराठा समाजाच्या हिताचा खून ठाकरे सरकारने केला आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली. समाजा समाजामध्ये तेढ लावण्याचं काम इंग्रजांनी केलं ते ठाकरे सरकार करत आहे म्हणून इंग्रजांना चले जाव म्हणायची वेळ आली तसेच ठाकरे सरकारला चले जावं असा इशारा आम्ही देत आहोत, असे आशिष शेलार म्हणाले. सासूने बायकोला माहेरी नेल्याचा घेतला विचित्र बदला; जावयाने केलं धक्कादायक कृत्य संजय राऊतांनी एक दिवस देवेंद्र फडणवीस हे मातोश्रीवर येतील, असं म्हणाले आहे. आम्ही मातोश्रीसोबत कधीच संबंध तोडले नाही. पण त्यांनीच तोडले आहे. राऊतांचं वक्तव्य हे आमंत्रण असेल तर आम्ही स्विकारलं आहे, असं प्रत्युत्तर शेलार यांनी राऊतांना दिलं. 'आम्हाला संपूर्ण मराठा आरक्षण हवंय, रोजगारामध्ये नोकऱ्यांमध्ये हवं आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या या आक्रोशाला आम्ही पूर्ण सक्रिय समर्थन आणि सोबतच पक्षाचा झेंडा विरहित आम्ही साथ देणार आहोत. आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत आणि लागू होईपर्यंत अन्य कुठल्याही  ओबीसी किंवा इतर आरक्षणाला नख लावण्याचे काम महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करू नये, ओबीसी समाजाला मिळणारे फायदे आहेत तसंच आरक्षणाचे फायदे मराठा समाजाला तातडीने लागू करा, तीन हजार कोटीचे पॅकेज यासाठी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. पाण्यात बुडणाऱ्या लेकीला वाचवताना आई आणि चुलत बहिणीसह तिघींचा मृत्यू आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण देण्याचा आदेश राज्य सरकारने काढला. हे आरक्षण मोदी सरकारने दिले होते. यात तुमचे कर्तृत्व काय? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला. मराठा समाजाच्या मोर्चा टिंगल टवाळी करण्याचे काम शिवसेनेने केले. छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागण्याची हिंमत सुद्धा शिवसेनेने केली, त्यामुळे तुम्ही भावनाशून्य होतात. गायकवाड आयोगाची मांडणी योग्य पद्धतीने केले नाही, तेव्हा कर्तृत्व हीन आहेत हे दिसून आले, अशी टीकाही त्यांनी केली.
Published by:sachin Salve
First published: