गडकरींना वाढदिवसाची वेगळी भेट, लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये मेणाचा पुतळा

गडकरींना वाढदिवसाची वेगळी भेट, लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये मेणाचा पुतळा

लोणावल्यातील प्रसिद्ध वॅक्स म्युझियममध्ये सुनील कुंडलूर यांनी नितिन गडकरींनी हुबेहुब मेणाचा पुतळा तयार केला आहे

  • Share this:

27 मे : केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरींना वाढदिवसाची वेगळी भेट मिळाली आहे. लोणावळ्यातील प्रसिद्ध वॅक्स म्युझियममध्ये गडकरींचा मेणाचा पुतळा साकारण्यात आलाय.

लोणावल्यातील प्रसिद्ध वॅक्स म्युझियममध्ये सुनील कुंडलूर यांनी नितिन गडकरींनी हुबेहुब मेणाचा पुतळा तयार केला आहे. हा पुतळा लोणावल्यातील वॅक्स म्युझियम मध्ये ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, नागपूरला गडकरींच्या शष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. या सर्वपक्षीय कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे यांच्यासह भाजपचं सरकार असलेल्या राज्यातले काही मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच राज्यातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदारही यावेळी उपस्थित राहणार आहेत. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्याचे आयोजक आहेत. या कार्यक्रमात भाजपचे आमदार आणि खासदारांनी गोळा केलेले 1 कोटी 1 लाख रुपये गडकरी यांनी दिले जाणार आहेत.

First published: May 27, 2017, 8:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading