पुण्याच्या समान पाणीपुरवठा योजनेच्या निविदा रद्द

पुण्याच्या समान पाणीपुरवठा योजनेच्या निविदा रद्द

1750 कोटींच्या या निविदा 3 कंत्राटदारांमध्ये संगनमताने विभागून दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

  • Share this:

पुणे, 3 ऑगस्ट: पुण्यातील समान पाणीपुरवठ्याच्या निविदा मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर रद्द करण्यात आल्या आहेत. 1750 कोटींच्या या निविदा 3 कंत्राटदारांमध्ये संगनमताने विभागून दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

पुण्याच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा आरोप केला होता. या संदर्भात खासदार संजय काकडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याच्या निविदा रद्द केल्या . काँग्रेसने महापालिकेच्या आवारात फटाके फोडले असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही पेढे वाटून जल्लोष केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 06:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading