काँग्रेसमुळेच झाली कृत्रिम पाणी टंचाई, भाजपचा आरोप

काँग्रेसमुळेच झाली कृत्रिम पाणी टंचाई, भाजपचा आरोप

काँग्रेसनं कृत्रिम पाणी टंचाई केली असा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी आज मामा चौकात लाक्षणिक उपोषण केलं.

  • Share this:

विजय कमळे, प्रतिनिधी

जालना, 19 मे : जायकवाडी पाणी योजना शहरात येऊनही जालना शहरात एकेक महिना नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही आहे. परिणामी विकतच्या टँकरवरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे जालना शहरात पाणी टंचाई नसून पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

काँग्रेसनं कृत्रिम पाणी टंचाई केली असा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी आज मामा चौकात लाक्षणिक उपोषण केलं. या उपोषणात पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत, गटनेते अशोक पांगारकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे आणि भाजपचे नगरसेवक सहभागी झाले आहेत.

हेही वाचा : Lok Sabha Election 2019: कुणाचं येणार सरकार? News 18-IPSOS Exit Poll आज देणार सर्वात अचूक अंदाज

आज सकाळी या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली. जायकवाडी योजनेचे पाणी शहराला येत असूनसुद्धा पालिकेचा ढिसाळ कारभार असल्यानेच महिना-महिना नागरिकांना पाणी मिळत नसल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

जायकवाडी योजनेला ठिकठिकाणी लागलेल्या गळतीलाही पालिकाच जबाबदार असल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, मुख्याधिकारी खांडेकर यांनी दिलेल्या आश्वासनांनंतर हे उपोषण सोडण्यात आलं. पण त्यामुळे जालन्यात पाणी टंचाईवरून आता काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आहेत. पण पक्षांच्या या भांडणामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.

चारा टंचाईमुळे पशुधन धोक्यात..मरणावस्थेत पोहोचलेल्या गायींना टरबूज खाऊ घालून वाचविण्याचा प्रयत्न

एकीकडे राज्यात चाऱ्याची टंचाई नसल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील करत असताना दुसरीकडे मात्र नाशिक जिल्ह्यात अनेक भागात भीषण चारा टंचाई निर्माण झाल्याने पशुधन धोक्यात आले आहे. आता चारा टंचाईचा फटका थेट गोशाळेतील पशुधनला बसला आहे. चारा मिळत नसल्यामुळे मरणाअवस्थेत पोहोचलेल्या गायींना टरबूज-खरबूज खाऊ घालून जगविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील नीळगव्हाण येथे असलेल्या गोशाळेत सध्या 1200 गायी आहेत. पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा अभूतपूर्व अशी चारा-पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा फटका गोशाळेतील या गायींना देखील बसत आहे.

चाऱ्याची कमतरता भासू लागताच गोशाळा संचालकांनी तहसिलदारांना जानेवारी महिन्यातच अर्ज देवून चाऱ्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे टरबूज-खरबूज खाऊ घालून गायींना जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चाऱ्याची सवय असलेल्या गायींचे टरबूज-खरबूजने पोट भरत नसल्याने त्या कमकुवत होऊन त्यांचे हाडे दिसू लागली आहे. या गायींना वाचविण्याचे असेल तर त्यांच्यासाठी तातडीने चारा-पाण्याची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे.

VIDEO : वाराणसीत मोदींनी काय काम केलं? काँग्रेस उमेदवाराने केला खुलासा

First published: May 19, 2019, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading