न्यूज18लोकमत इम्पॅक्ट : लाखो वारकऱ्यांसाठी चंद्रभागेत उजनी धरणातून सोडलं पाणी

न्यूज18लोकमत इम्पॅक्ट : लाखो वारकऱ्यांसाठी चंद्रभागेत उजनी धरणातून सोडलं पाणी

आता लाखो वारकऱ्यांसाठी चंद्रभागेत उजनी धरणातून 15 हजार क्युसेक्स पाणी सोडलं.

  • Share this:

25 मार्च : येत्या 28 मार्चला पंढरपूरमध्ये चैत्री वारीचा सोहळा संपन्न होतोय. त्यासाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होणाराहेत. मात्र वारकऱ्यांच्या स्नानासाठी बंधाऱ्यामध्ये अडवण्यात आलेलं पाणी वाळू चोरट्यांनी बंधाऱ्यांची दारं उघडून सोडून दिल्यानं चंद्रभागेचं पात्र कोरडंठाक पडलं. त्यामुळे वारकऱ्यांवर डबक्यातल्या दुर्गंधीयुक्त पाण्यात अांघोळ करण्याची वेळ आली होती. पण आता लाखो वारकऱ्यांसाठी चंद्रभागेत उजनी धरणातून 15 हजार क्युसेक्स पाणी सोडलं.

ही बातमी न्यूज18 लोकमतनं दाखवताच त्याचा परिणाम पाहायला मिळालाय. न्यूज18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनानं उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडलंय. त्यामुळे आता वारकऱ्यांना भीमा नदीत स्नान करता येणाराय. त्यामुळे लाखो  वारकऱ्यांची गैरसोय टळणाराय.

First published: March 25, 2018, 9:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading