पाऊस गायब झाल्यामुळे महाराष्ट्रात तीव्र पाणीबाणी, धरणं पडली कोरडीठाक
पाऊस गायब झाल्यामुळे महाराष्ट्रात तीव्र पाणीबाणी, धरणं पडली कोरडीठाक
जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे देशभरातलं पाणीसंकट तीव्र होण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्र आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये पाणीबाणी आहे. मोठ्या धरणांमधले पाणीसाठे आटले आहेत. त्यातच गेली दोन दशकं उपसा झाल्यामुळे भूमिगत पाण्याची पातळीही चांगलीच खालावली आहे.
आकाश गुळणकरमुंबई, 26 जून : जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे देशभरातलं पाणीसंकट तीव्र होण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्र आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्येही पाणीबाणी आहे. मोठ्या धरणांमधले पाणीसाठे आटले आहेत. त्यातच गेली दोन दशकं उपसा झाल्यामुळे भूमिगत पाण्याची पातळीही चांगलीच खालावली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार 19 जूनपर्यंत 43 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. शेती, घरगुती वापर आणि उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या पाणीपुरवठ्यावर याचा विपरित परिणाम होणार आहे.
ऐन पावसाळ्यात दुष्काळ
महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश यासारख्या राज्यात तर ऐन पावसाळ्यात दुष्काळासारखीच परिस्थिती आहे. या पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रात 60 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भामध्ये तर पावसाच्या टक्केवारीत 75 ते 89 टक्के घट आहे.
सुप्रिया सुळेंची राज्याच्या राजकारणात एण्ट्री? दिल्लीतील घडामोडींनंतर नवी चर्चा
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात फक्त सरासरीपेक्षा एक तृतियांश पाऊस पडला. मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्येही हीच स्थिती आहे. यावर्षी कर्नाटकमध्ये मात्र चांगला पाऊस होतो आहे. महाराष्ट्रात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असाच हवामान विभागाचा अंदाज आहे.
11 धरणात शून्य टक्के साठा
देशभरातल्या एकूण 91 मोठ्या धरणांपैकी 11 धरणात शून्य टक्के पाणीसाठा उरला आहे. बाकीच्या धरणांमधलाही 80 टक्के पाणीसाठा वापरून संपला आहे. महाराष्ट्रातल्या धरणांना तर या कमी पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे, असं आकडेवारी सांगते.
गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या दक्षिण भारतातल्या तीन प्रमुख नद्यांच्या खोऱ्यात जेवढा पाणीसाठा असायला हवा होता तेवढा राहिलेला नाही. गेल्या दशकभराचा आढावा घेतला तर या नद्यांमध्ये जेवढं पाणी असायला हवं होतं त्याच्या निम्मंच उरलं आहे.
सलग काही वर्षं पडलेला दुष्काळ आणि अनियमित येणाऱ्या पावसामुळे भूमिगत पाण्यावर अवलंबून राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळेच 2007 ते 2017 या काळात भूमिगत पाण्याची पातळी 61 टक्क्यांनी घटली आहे. उत्तर भारतातल्या विहिरी यामुळे आटून गेल्या आहेत. भूमिगत पाण्याचा उपसा किती प्रचंड प्रमाणात होतो आहे याचाच हा पुरावा आहे.
============================================================================================
VIDEO : शाळेत जाताना तुमची मुलं तर करत नहीये ना असा प्रवास ?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.